(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Arvind Kejriwal : जेलमध्ये इन्सुलिन दिलं नाही, CCTV लावले, ठाकरेंसमोर गरजले; केजरीवालांचे 10 मुद्दे
Arvind Kejriwal Shivaji Park Speech : वन नेशन वन लीडरसाठी मोदी काम करत आहेत. जर मोदी यामध्ये जिंकले तर उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी हे सगळे तुरुंगात असतील असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
मुंबई : दिल्लीतील लोकांसाठी मी अनेक रुग्णालयं निर्माण केली, मोफत उपचार दिले, पण जेलमध्ये टाकल्यानंतर मोदींनी मला इन्सुलिनचे औषधही दिलं नाही असा घणाघाती आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. 4 जून रोजी मी जेलमध्ये असणार आहे, तिथून देशाचा निकाल पाहणार, त्यामुळे लोकशाही वाचवायची असेल तर मोदींनी नाकारलं पाहिजे असंही अरविंद केजरीवाल यांनी आवाहन केलं. अरविंद केजरीवाल हे महाविकास आघाडीच्या शिवाजी पार्कवरील सभेला संबोधित करत होते.
अरविंद केजरीवाल यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
थेट तुरुंगातून तुमच्याकडून आलोय, जेलचे उत्तर व्होटने द्यायचे. मी झोळी पसरवून तुमच्याकडे भीक मागायला आलोय या देशायाला वाचवायला. हे देश आणि लोकशाही संपवण्याचे प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत.
दिल्लीमध्ये 70 मधील 67 जागा 'आप'ला मिळाल्या होत्या. नंतर 62 मिळाल्याआणि भाजला 8 जागा मिळाल्या. 'आप'ला हरवू शकणार नाही हे लक्षात आल्याने खोटे गुन्हे दाखल करून सिसोदिया, मला अटक केली. त्यांना वाटल मी राजीनामा देईन मी तुरुंगातून राज्य चालवताचा निर्णय घेतला.
लोकशाहीला जर ते तुरुंगात टाकत असतील तर आन्ही तुरुंगातून राज्य चालवू. मी दिल्लीतील गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मला अटक केली.
तुमच्या मनाचा मोठेपणा यात होता की मी जर शेकडो शाळा काढल्या तर तुम्ही हजारो शाळा काढायला पाहिजे होतात. मी शेकडो हास्पिटल काढले, पण पंधरा दिवस तुरुंगात असताना माझे औषध मोदींनी बंद केले. माझं शुगर तीनशे पर्यंत गेलं, पण मला इन्सुलिन दिलं नाही. इन्सुलिन मिळालं नाही तर किडनी खराब होते. मला माहिती नाही त्यांना माझ्यासोबत काय करायचे होते.
मी दिल्लीत वीज बिल फ्री केलं, तुम्ही देशभरात हे करायला हवे होते. पण तुम्ही मला अटक केली .
मी 2 जूनला पुन्हा तुरुंगात जाईन असं ते म्हणतायत, आता हे तुम्ही ठरवायचं आहे. मोदींना मत दिले की मी तुरुंगात जाईन आणि इंडियाला दिले की मी आझाद राहीन.
रशियामध्ये विरोधकांना अटक केली आणि मोठ्या प्रमाणात पुतीनला मतं मिळाली.
मोदींना भारताला बांगलादेश आणि पाकिस्तान करायचे आहे. निवडणुकीच्या एक महिना पूर्वी काँग्रेसचे अकाउंट सील केले. आता आमचे अकाउंट सील करण्याची तयारी सुरू केलीय.
तुमच्यामध्ये दम असेल तर डोळ्यात डोळे घालून निवडणूक लढा.
वन नेशन वन लीडरसाठी मोदी काम करत आहेत. त्यासाठी विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं काम सुरू आहे. जर मोदी यामध्ये जिंकले तर उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी हे सगळे तुरुंगात असतील.
त्यांच्या पार्टीतील देवेंद्र फडणवीस, शिवराज चौहान, वसुंधरा राजे या सर्वांना मोदींनी संपवलं. आता एकच राहिले आहेत, योगी आदित्यनाथ. जर मोदी पुन्हा जिंकले तर दोन महिन्यात योगींनाही मुख्यमंत्रीपदावरून काढतील.
75 वर्षाचा जो नेता होईल त्याला रिटायर्ड करण्याचा नियम यांनी केला. अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन या सर्वांना नियम लागू केला. आता पुढच्या वर्षी मोदी 75 वर्षाचे होत आहेत. आता स्वतः नंतर अमित शहा यांना पंतप्रधान करणाऱ्याचं त्यांच्या मनात आहे. मोदी स्वतःसाठी नाही अमित शाह यांच्यासाठी मते मागत आहेत
मोदी भक्तांनी हा विचार करावा की त्यांचे मत हे मोदींना नाही तर अमित शाह यांना जाणार आहे.
मोदी काही दिवसांपूरवी महाराष्ट्रमध्ये आले होते, आता पुन्हा आले. मोदी इथे येऊन खूप शिव्या देतात, पवार साहेबाना भटकती आत्मा म्हणाले. ही पंतप्रधानाला शोभणारी भाषा नाही, ही सडकछाप भाषा आहे.
उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणाले, ही पंतप्रधानाची भाषा असते? हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा अपमान नाही तर महाराष्ट्रचा अपमान आहे. त्यामुळे आता तुम्ही या अपमानाचा बदला घ्या.
माझ्या तुरुंगात सिसीटीव्ही लावले, मोदींच्या कार्यालयात याचे स्क्रीन होते. मी काय करतो या प्रत्येक गोष्टीवर त्यांची नजर असते. मी 21 दिवस बाहेर आहे, यामध्ये मी देशासाठी काम करायचे ठरवले आहे.
जो करेंगे उद्धव ठाकरेंसे प्यार, वो करेंगे मोदींका इनकार. असली शिवसेना आणि असली राष्ट्रवादी... चिन्ह बदलले हे तुम्हाला सर्वांना सांगावं लागेल .
4 तारखेला मी तुरुंगात असेन, तुरुंगातून मी देशाचा निकाल बघेन. तेव्हा 48 मधील 42 जागा इंडिया आघाडीच्या असायला हव्यात.