Anna Hazare on Sharad Pawar, Ahmednagar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका केली होती. "माझ्यावर अण्णा हजारे आणि बीएमसीचे माजी अधिकारी जी आर खैरनार यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले होते, मात्र आता या दोघांचा कुठे थांगपत्ता नाही", असं म्हणत शरद पवारांनी आण्णा हजारेंना (Anna Hazare) डिवचलं होतं. दरम्यान शरद पवारांच्या टीकेला आता आण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


काय म्हणाले आण्णा हजारे? 


बारा वर्षांनी शरद पवारांना जाग आली. मी केलेल्या आंदोलनामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले. कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली, असं प्रत्युत्तर अण्णा हजारेंनी दिलं आहे. पद्मसिंह पाटील शरद पवारांचे नातेवाईक होते, त्यांच्याविरुद्धही मी आंदोलन केले होते. त्यामुळेही त्यांना त्याचा राग असावा. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मध्यंतरी माझ्यावर टीका केली होती, मात्र शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड हे समविचारी असल्यामुळे ते एकत्र राहणारच असा टोलाही अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी यावेळी लागवला आहे.


लोकसभेवेळी आण्णा हजारेंनी केले होते मतदारांना आवाहन 


मतदान करताना उमेदवार आचारशील, विचारशील, निष्कलंक जीवन, अपमन सहन करण्याची शक्ती असणारा निवडा. तो दिव्यासारखा झटत राहिला पाहिजे. मतदाराना ज्यांना मतदान करायचे त्याचे चारित्र्य कसे आहे? त्याचे आचार- विचार कसे आहे? त्याचे जीवन निष्कलंक आहे का? दाग लागलेले आहे का? हे पाहिले पाहिजे. खरी लोकशाही आणायची असेल तर मतदारांची जबाबादारी महत्त्वाची आहे, असे अण्णा हजारेंनी (Anna Hazare) म्हटलं होतं.  1857- ते 1947 तब्बल 90 वर्षे बलिदान देत या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ते स्वातंत्र्य आबाधित ठेवायचे असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे. मतदार जागृक होईल त्याचदिवशी देशामध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने येईल, असेही अण्णा हजारे (Anna Hazare) म्हणाले होते.


इतर महत्वाच्या बातम्या 


Pune Accident : मोदींच्या काळात न्यायदेखील श्रीमंतांचा गुलाम, ट्रक-बस ड्रायव्हरला जी शिक्षा ती पोर्श चालवणाऱ्या मुलाला का नाही? पुण्यातील अपघातावरून राहुल गांधींची टीका