Anjali Damania on Suraj Chavan : "राज्याची भ्रष्टाचाराने वाट लावली आहे. खिरापतीसाठी पैसा वाटत आहेत. लाडकी योजना लोकांना पैसे मिळावेत आम्हाला काही प्रॉबलम नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीला टॅक्सच्या माध्यमातून पैसे भरतो. प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे. डिजीटलद्वारे आम्ही पैशांचे व्यवहार करतो. शरद पवारांसोबत फारकत घेतल्यानंतर पैसा आला कुठून? तुमच्या आई बहिणीला रिचार्ज करणारी बाई म्हटलं तर चालेल का?" असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांना केला आहे. 


माझ्या उत्पन्नाचे स्त्रोत सांगायचे आहेत, हेच तुम्ही राज्यातील सर्व नेत्यांकडूनही घ्यावेत


अंजली दमानिया म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे चिल्ले पिल्ले असलेल्या सूरज चव्हाण व अमोल मिटकरी यांनी माझावर खालच्या दर्जाची टिका केली. म्हणून आज पत्रकार परिषद बोलवली. सामाजिक कार्यकर्ता बोलतानाही विचार करावा. आम्ही कोण आहोत आम्ही कुठे गेलो, माझ्या उत्पन्नाचे स्त्रोत सांगायचे आहेत. हेच तुम्ही राज्यातील सर्व नेत्यांकडूनही घ्यावेत. माझा महाराष्ट्रीयन कुटुंबात जन्म झाला, गुजराती भाषिक व्यक्तीसोबत लग्न केलं. माझ़ं शिक्षण, माझा पदव्या, माझं डायग्नोस्टिक सेंटर होतं जे मी काही वर्षापूर्वी 2015 मध्ये प्रॅक्टिस बंद केली. 


 27 कोटीतले 2 कोटी आम्ही भरायचो, 5  पासपोर्ट आहेत


पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, माझे पती ज्यांच्या 4 पदव्या आहेत त्यात एक सीए आहेत देशातून 32 वे आहेत. ते पास झाल्यानंतर त्यांना तिथे नामंकित कंपनीत कामाला आहेत. आता ते जे एम कंपनीत CEO आहेत. 2014 ला दहा वर्षापूर्वी मी माझं प्रतिज्ञा पत्रात 1 कोटीहून अधिक दाखवलेला आहे. या वर्षीही मी इनकम टॅक्स भरला आहे. 30 लाख महिन्याला आम्हाला मिळतात. मी यावेळी आरटीआय इनकमही भरला आहे. विद्वान सुरज चव्हाण यांना सांगायचं आहे. जे म्हणालेत त्या 27 कोटीतले 2 कोटी आम्ही भरायचो. 5  पासपोर्ट आहेत, एकाच नावाने आहेत. पाच आहेत ते म्हणजे विविध ठिकाणी गेल्याने पानं संपली. 


या 12 महिन्यात 10 इंटरनॅशनल ट्रिप केल्या आहेत. ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो. त्याच्या विरोधात लढणयात अर्थ नाही हे ओळखून आम्ही आता लढणं कमी केलं. अजित पवार यांची गुलाबी यात्रा पाहिली. पक्षात 40 गाड्या वाटल्या हे पैसे आले कुठून? माझाकडे सर्व राजकिय नेत्याचे डिटेल्स आहेत, असंही अंजली दमानिया यांनी सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


"सुप्रिया सुळेंचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल तर त्यांनाही लाडकी बहीणचे 1500 देऊ"