Anil Patil on Supriya Sule, नंदुरबार : "सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर त्यांनाही राज्य सरकार लाडकी बहिण योजनेचे (Ladaki Bahin Yojana) पंधराशे रुपये देईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजना बंद पाडेल. शेतकऱ्यांना मोफत मिळणारी वीज बंद पाडतील", असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री अनिल पाटील (Anil Patil ) म्हणाले. ते नंदुरबारमध्ये बोलत होते. यावेळी अनिल पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
सरकार महिलांना लाच देत नसून भाऊबीजेची ओवाळणी देत आहे
अनिल पाटील म्हणाले, सरकार महिलांना लाच देत नसून भाऊबीजेची ओवाळणी देत आहे. उद्धव ठाकरे यांना बहिणीला दिलेली ओवाळणीला लाच म्हणून ते तमाम महाराष्ट्रातील महिलांचा अपमान करत आहे, शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. मात्र, आघाडी सरकार आल्यानंतर तो मागे घेण्याचा निर्णय घेतला जाईल. राज्यातला शेतकरी असेल युवक असेल, युवती असतील महिला असतील हेच सरकार परत आणण्यासाठी जबाबदारीने काम करतील.
राऊतांच्या पराक्रमामुळे हा उशीर झालेला होता
संजय राऊत यांच्या पराक्रमामुळे 30 नोव्हेंबरला आमचा शपथविधी झालेला आहे. 30 नोव्हेंबर पासून आमचा 5 वर्षांचा कालावधी सुरु आहे. याचा अर्थ राज्यातील निवडणुका 30 नोव्हेंबर पर्यंत घेतल्या पाहिजेत. राऊतांच्या पराक्रमामुळे हा उशीर झालेला होता. त्यामुळे आमचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर पर्यंत आहे, असंही अनिल पाटील म्हणाले.
सुप्रिया सुळे काय काय म्हणाल्या होत्या?
बहिणीचं नातं आमच्या भावाला कळलंचं नाही. प्रेमात पैसे आले की ते नातं होतं नाही. प्रेमात आणि व्यवसायामध्ये माझ्या भावांनी गल्लत केली. बहिणीचं नातं हे 1500 रुपयात विकत घेता येत नाही. त्यांचं नातं फक्त मताशी जोडलेलं आहे. व्यवसायात प्रेम नसते. जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे दुर्दैव आहे की, त्यांना व्यवसाय आणि प्रेमातले अंतर कळले नाही. ते म्हणतात की, एक बहीण गेली तरी हरकत नाही दुसऱ्या बहिणी आणू. पंधराशे रुपयाला या राज्यातलं नातं बिकाऊ नाही? हा आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस असणारा बहिण भावाच्या प्रेमाला किंमत लावायचे पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Ajit Pawar: लाडक्या बहिणींना पुढच्या पाच वर्षात 90 हजार देणार, फक्त एकच अट, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने शब्द दिला!