Anjali Damania on Laxman Hake : काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असलेल्या कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कैलास फड याचा व्हिडीओ पोस्ट करुन याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आवाज उठवला होता. दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी कैलास फड याच्यावर कारवाई केली होती. कैलास फड याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, न्यायलयाने 24 तासानंतर त्याला जामीन मंजूर केला होता. दरम्यान, आता याच कैलास फडसोबत लक्ष्मण हाकेंचे फोटो अंजली दमानिया यांनी शेअर केले आहेत. ट्वीटरवरुन अंजनी दमानिया यांनी याबाबत भाष्य केलंय. 




अंजली दमानिया म्हणाले, आणि एक फोटो आला …. या वेळी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे समर्थक कैलाश फड यांच्या बरोबरचा हा फोटो. 
हेच कैलास फॅड व त्यांचे सुपुत्र हे 2024 च्या निवडणुकीत बूथ वर हैदोस घालत होते...


गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर देखील टीका केली आहे. त्यानंतर अंजली दमानियांनी ट्वीटवर पोस्ट करत समाचार घेतलाय. 




लक्ष्मण हाके काय म्हणाले होते? 


अंजली दमानिया नावाची सोशल वर्कर आली त्या ताईना माझं सांगणं, ऊसतोड कामगारांची पोर काबाड कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन अधिकारी झाले. गेल्या काही दिवसापासून हत्या करणाऱ्या आरोपींची जात शोधून विशिष्ट जातीला आरोपीच्या कठड्यात उभ करण्याचे काम बीड जिल्ह्यातील काही पुढारी करत आहेत..धस म्हणतो गँग ऑफ बीड म्हणतो, गँग ऑफ वासेपूर म्हणतो..ज्या वेळी अंतरवाली सराटीमध्ये गोळीबार झाला, महिला पोलिसांचा विनयभंग झाला, बीड जाळलं.. तेव्हा गँग ऑफ वासेपूर बीड नव्हत का?..असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Ajit Pawar : संतोष देशमुख हत्या प्रकरण अमित शांहाच्या दारी? अजितदादांनी घेतली अमित शाहांची भेट, बीड प्रकरणावर चर्चा झाल्याची शक्यता


Sangli Crime : तमाशामध्ये दंगा करणाऱ्या विरुद्ध तक्रार केल्याच्या कारणातून 6 जणांनी मिळून एकाला भोसकून संपवलं, न्यायालयाकडून 5 जणांना मरेपर्यंत जन्मठेप