Sangli Crime : सांगलीतील कवठेमहांकाळ (Sangli Crime) तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे काही वर्षांपूर्वी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तमाशामध्ये दंगा करणाऱ्या विरुद्ध तक्रार केल्याच्या कारणातून सहा जणांनी एकाचां भोसकून निर्घृण खून केला होता. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी पाच जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा ठोठाविण्यात आलेल्यांमध्ये संदीप दादासो चौगुले, विशाल बिरुदेव चौगुले, नानासो उर्फ सागर माणिक चौगुले, कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कनप आणि विजय आप्पासो चौगुले यांचा समावेश आहे.
सहा जणांनी मिळून केला होता एकाचा भोसकून खून
अधिकची माहिती अशी की, धुळगाव येथे (Sangli Crime) काही वर्षांपूर्वी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तमाशामध्ये दंगा करणाऱ्या विरुद्ध तक्रार केल्याच्या कारणातून सहा जणांनी एकाचा भोसकून निर्घृण खून केला होता. सर्व आरोपी अग्रण धुळगाव येथे यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तमाशा वेळी दंगा करीत होते. याप्रकरणी मयत अशोक भोसले, त्याचा भाऊ आणि वडील या तिघांनी पंच कमिटीकडे तक्रार केली होती. याचा राग मनात धरून सर्व आरोपींनी अशोक याचा कुकरी आणि गुप्तीने भोसकून निर्गुण खून केला होता. याप्रकरणी सर्वांना अटक करण्यात आली होती. तब्बल दोन वर्षे यावर सुनावणी झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने खून प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलीये. तसेच गुन्ह्यात सहभागी असल्या प्रकरणी 143 कलमान्वये दोशी धरून सर्वांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलीये.
न्यायालयाकडून एकाची निर्दोष मुक्तता
सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी कामकाज पाहिजे. त्यांनी केलेल्या युक्तीवादा नुसार हा निकाल न्यायालयाने सुनावलाय. तसेच जिल्ह्यातील हा प्रथमच निकाल असल्याचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सांगितले. तसेच या गुन्ह्यात एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती व त्याचा सख्खा जुळा भाऊ या दोघांपैकी कुणाचा गुन्ह्यात नेमका कुणाचा सहभाग होता याची पडताळणी होऊ शकली नसल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये.
इतर महत्त्वाच्या बातम्या