मुंबई: ज्या किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला, भाजपसाठी एवढं मोठं काम केलं, अनेकदा त्यासाठी मारही खाल्ला, त्यांना त्यांच्या पक्षाने एक खासदारकीही देऊ नये हे दुर्दैवी असल्याचं मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी व्यक्त केलं. किरीट सोमय्यांच्या एका व्हिडीओनंतर त्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा राहिली नाही, त्यांच्या अनेक भानगडी असल्याचं सांगत पुढे एक ना एक दिवस त्यांही बाहेर येतील असा दावाही त्यांनी केला. 'एबीपी माझा'शी संवाद साधताना अनिल परब यांनी हा दावा केला. 


किरीट सोमय्यांचा तो वादग्रस्त व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांना राज्यातील भाजप नेत्यांकडून म्हणावी तितकी मदत मिळाली नाही, राज्यातील नेते आपल्यापासून अंतर बाळगून राहिले असा दावा त्यांनी केला होता. केंद्रातून सांगितल्यानंतर त्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं. सोमय्या यांच्या या वक्तव्यावर अनिल परबांनी प्रतिक्रिया दिली. 


अनिल पबर म्हणाले की, असा व्हिडीओ आल्यावर त्या विकृत माणसाला कोण साथ देणार? त्याच्या अनेक भानगडी आहेत, त्या येतील बाहेर कधीतरी.  एक ना एक दिवस त्यावर गौप्यस्फोट होईल. 


किरीट सोमय्यांचा वापर करून फेकून दिला


किरीट सोमय्यांचा वापर करून फायदा झाल्यावर भाजपने त्यांना फेकून दिल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. ते म्हणाले की, किरीट सोमय्या हा माकड आहे आणि मदारी सांगेल तसं तो नाचतो. ज्याच्यावर आरोप करायला सांगितलं जातं त्याच्यावर आरोप करतो. त्यानंतर तो व्यक्ती भाजपात आल्यानंतर किरीट सोमय्याला बाजूला केलं जातं. हे जे काही भुंकणारे लोक आहेत, ते मनापासून हे काम करत नाहीत. 


किरीट सोमय्यांना एक खासदारकीही नाही


किरीट सोमय्यांनी एवढ्या नेत्यांवर आरोप केले, त्यातून अनेक नेते भाजपमध्ये गेले, सोमय्यांनी भाजपसाठी एवढं काम केलं, पण त्यांना एक खासदारकीही देऊ नये याचं वाईट वाटतं असं अनिल परब म्हणाले. ज्या माणसाने तुमच्यासाठी मार खाल्ला, त्याला आज त्याच्या बायका पोरांसमोर तोंड दाखवायला लाज लाज वाटते, पण तरीही त्याला भाजपकडून एक खासदारकीही दिली जात नाही हे दुर्दैवी आहे असं परब म्हणाले. 


किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करताना हे वैयक्तिक असल्याची आमच्यावर टीका केली जाते. पण तुम्ही आमच्या घरात ईडी घुसवता, आमच्या बायका मुलांना प्रश्न विचारता. माझा मुलगा कॉलेजमध्ये जातो, त्याला ईडी प्रश्न विचारते हे पर्सनल नाही का असा सवाल अनिल परब यांनी केला. 


महापालिकेतील 30 वर्षाचं काम काढा


गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेने महापालिकेत भ्रष्टाचार केला असा आरोप भाजपकडून केला जातोय. त्यावर बोलताना अनिल परब म्हणाले की, तीस पैकी 25 वर्षे भाजप आमच्यासोबत होतं. त्यावेळी त्यांना भ्रष्टाचार दिसला नाही का?
आमचं म्हणणं असं आहे की पूर्ण 30 वर्षांचं काम काढा, एकदा बाहेर येऊच द्या. आता जे काही सुरू आहे तेपण बाहेर येऊ द्या. 


ही बातमी वाचा: