भंडारा : लोकसभेच्या उमेदवाराची ओळख ही भाजपचा उमेदवार नाही तर मोदींचा (Narendra Modi) उमेदवार अशी होते, त्यामुळे काँग्रेसला संपवा अशी घोषणा करणाऱ्या मोदींनी आता भाजपलाच संपवलं आहे अशी टीका वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. मोदींमुळे देशाची इज्जत धुळीस मिळत आहे, याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना लाज वाटत नाही का असा सवालही त्यांनी केला. प्रकाश आंबेडकर भंडाऱ्यामध्ये प्रचारासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. 


ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातील मुद्दे 


भाजप आणि मोदींकडून गॅरंटीचा प्रचार केला जात आहे. गुजरातमध्ये 21 हजार कोटींचे हिरॉईन जप्त केलं होतं. 21 हजार कोटी नाही, तर 52 हजार कोटींचा ड्रॅग्ज आणण्याची यांची गॅरंटी आहे. 30 टक्के महागाई वाढवली त्याची गॅरंटी मोदी देत आहेत. अचानक टॉमॅटो भाव वाढलेत आणि लगेच भाव पडलेत. नवीन टॉमॅटो नाहीत, मात्र मोदींची गॅरंटी करून लूट करतात. 145 कोटींची लूट दरवर्षी करतात, याची गॅरंटी मोदींची आहे. 


हिंदू देश सोडून जात आहेत


मोदी दुसरी गॅरंटी काय देतात? दहा वर्षात सरकारी निमसरकरी कंपन्या बंद पाडल्या. नोकऱ्या कमी झाली, 12 कोटी बेरोजगार झालेत, मोदी याची गॅरंटी देतात. तुम्ही अशांना मतदान करणार का? मी संघाच्या स्वयंसेवकांना विचारतोय, कशाची गॅरंटी देता? 17 लाख कुटुंब भारतीय नागरिकत्व सोडून गेलेत. मोदींसाठी मत मागता याची सनातन हिंदूंना लाज वाटत नाही? तुम्ही हिंदू राष्ट्र करायला निघाला आणि त्याच हिंदूंना देश सोडून जावं लागतं.


देशाची इज्जत धुळीस मिळत आहे


सीबीआय, इन्कमटॅक्सच्या माध्यमातून देशाची इज्जत धुळीस मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना याची लाज वाटत नाही का? लोक देश सोडून जात आहेत. आता संघवाल्यांनासुद्धा शिव्या देवून काही फायदा नाही. मोदी हे मोहन भागवतांना भेटीची वेळ देत नाहीत. संघाशी आमचे मतभेद आहेत. मात्र पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसवणाऱ्या मोहन भागवतांना मोदी दोन वर्षे भेटीची वेळ देत नाहीत. त्यामुळं मोदी हुकुमशाह झालेत.


भाजपला चीनकडून पैसा मिळाला काय याचा खुलासा करावा


निर्मला सीताराम यांना बोलता येत नाही, त्या मंत्री आहेत. निर्मला सीताराम यांचं कट कारस्थान कळलं, ते त्यांच्या पतीने मुलाखतीत सांगितलं. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास या देशाचा नकाशा बदललेला असेल. 56 इंचाची छाती म्हणणाऱ्यांची छाती आता दोन इंचाची झाली आहे. पाकिस्तान कंगाल असला तरी वरचढ झाला आहे. निवडणून रोख्यांची माहिती समोर आली. भाजपला चीनकडून पैसे मिळाले का याचा खुलासा मोदींनी करावा. त्यावर मोदी  
चायना कडून पैसे आले का? याचा खुलासा करावा. मोदी मूग गिळून गप्प बसले आहेत.


कुपवाड्यात मोठ्या प्रमाणात दहशतवाद वाढला आहे. जे गोध्रा आणि मणिपूरमध्ये झाले, ते मोदींना पंतप्रधान केल्यास भारतात ठिकठिकाणी पुन्हा घडेल. 2024 ही शेवटची निवडणूक असणार आहे, 2029 मध्ये निवडणूक होणारच नाही.


मोदींवर विश्वास म्हणजे रामभरोसे


मोदींवर विश्वास ठेवत असाल तर तो रामभरोसे विश्वास आहे. उमेदवारांची ओळख ही मोदींचा उमेदवार अशी ओळख होते. फडणवीस, भाजपचा किंवा अन्य पक्षाचा उमेदवार अशी ओळख नाही. मोदींनी काँग्रेस संपवा अशी घोषणा केली, पण आता काँग्रेस तर संपली नाही, पण भाजप मात्र संपला आहे. आता प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदींना या देशाचं वाटोळं करायचं आहे.


ही बातमी वाचा: