Anil Deshmukh on Devendra Fadnavis : "आमचे लोक भाजपसोबत गेले कारण त्यांना ईडीची भीती होती. भाजप ने तोडाफोडीचा राजकारणी केलं. मात्र, भाजपवाले अश्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे  महाराष्ट्राचे प्रश्न  विसरून गेले. परमवीर सिंह यांना देवेंद्र फडणवीस (Anil Deshmukh ) यांनी सांगितलं की तू अनिल देशमुख यांच्यावर आरोप कर आम्ही तुला क्लीन चिट देऊ. त्यानंतर तुझं पदही तुला देऊ. त्यामुळे खोट्या आरोपांमुळे माझ्यावर कारवाई झाली", असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Devendra Fadnavis) म्हणाले. वर्धा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आज (दि.22) सभा पार पडली. यावेळी अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh ) खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar),  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. 


आपल्याला खासदार अमर काळे सारखा हवा आहे


पुढे बोलताना अनिल देशमुख (Anil Deshmukh ) म्हणाले, आपल्याला खासदार अमर काळे सारखा हवा आहे. आम्ही सगळ्यांनी त्यांचं काम जवळून पाहिलय. परमवीर सिंह यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, तू अनिल देशमुख यांच्यावर आरोप कर आम्ही तुला क्लीन चिट देतो आणि पदही कायम ठेवतो. 


तर आपलं जीवन उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही


शरद पवार म्हणाले, ही निवडणूक आगळी वेगळी आहे. जर आपण योग्य उमेदवाराला निवडून दिलं नाही, तर खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. दिल्ली ही देशाची राजधानी आहे त्याचा चेहरा मोहरा बदलण्याची कामगिरी ज्यांनी केली त्या केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलय. हुकूमशाही देशात फोफावत आहे, जर योग्य वेळी याला थांबवलं नाही तर आपलं जीवन उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. मला मुंबईच्या जवळच्या जिल्ह्यात जायचं आहे, त्यामुळे लवकर मी आपली रजा घेणार आहे, असंही शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. 


अनिल देशमुख यांच्यावर कोणते आरोप झाले होते?


अनिल देशमुख (Anil Deshmukh ) महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा गृहमंत्री होते. " गृहमंत्री आम्हाला 100 कोटी रुपये महिन्याला वसूल करायला सांगतात", असा आरोप तत्कालीन मुंबईचे पोलीस कमिश्नर परमवीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh ) यांच्यावर केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Madha Loksabha : माढ्यात निंबाळकरांना धक्के सुरुच, फलटणमधून रामराजेंच्या भगिनी मोहिते पाटलांना पाठिंबा देणार