Anil Deshmukh : अनिल देशमुखांकडून बीडमध्ये 'लाव रे तो व्हिडीओ', मोदींनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने दाखवली
Anil Deshmukh on Narendra Modi, Beed : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडली.
Anil Deshmukh on Narendra Modi, Beed : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी 'लाव रे तो व्हिडीओ'चा प्रयोग केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 2014 मध्ये शेतकऱ्यांना कोणती आश्वासने दिली? हे अनिल देशमुख यांनी भर सभेत दाखवले आहे. "देशातील प्रत्येक शेतकऱ्याचे भाग्य बदलण्याचे माझे स्वप्न आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल होणार आहे", असे पीएम मोदी या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत. अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) हा व्हिडीओ भर सभेत दाखवलाय.
ओबीसी बांधवांना भयभीत करण्याचं राजकारण करत आहेत
बजरंग सोनवणे म्हणाले, मला शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या लेकरांचं भलं करणारी पालखी वाहायची आहे. दीड लाख ठेवीदारांच्या ठेवी बुडून इथल्या बँक चालकाने भाजपात प्रवेश केला. खासदार झाल्यावर पहिल्यांदा या संचालकावर कारवाई करणार आहे. विरोधक ओबीसी बांधवांना भयभीत करण्याचं राजकारण करत आहेत. ओबीसींसाठी विरोधकांनी काय केलं ? सांगावं.
बहीण दहा वर्ष खासदार मग जिल्हा मागासलेला हे कोणाचे पाप आहे?
शरद पवारांनी आम्हाला कधी जात शिकवली नाही. बहिण भाऊ पाच वर्षे आमदार आहेत. बहीण दहा वर्ष खासदार मग जिल्हा मागासलेला हे कोणाचे पाप आहे? मला शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या लेकरांचं भलं करणारी पालखी वाहायची आहे. दीड लाख ठेवीदारांच्या ठेवी बुडून इथल्या बँक चालकाला भाजपात प्रवेश केला. खासदार झाल्यावर पहिल्यांदा या संचालकावर कारवाई करणार आहे. जातीच आणि पैसे देऊन मत घेण्याचं अमिष दाखवण्याचं पाप भाजप करत आहे.
मराठा आरक्षणासाठी आणि शेतकऱ्यांसाठी लढणार
संसदेत जाऊन मी हसणार नाही तर मराठा आरक्षणासाठी आणि शेतकऱ्यांसाठी लढणार आहे. तर ओबीसी बांधवांच्या न्यायासाठी लढणार आहे. बीड जिल्ह्यात बहीण भावाने गुंडाराज चालवलं आहे. आता आपल्याला रामराज्य आणायचं आहे, असंही सोनवणे म्हणाले.
धनंजय मुंडेंची सोनवणेंवर टीका
महायुती सरकारने मागणीचा सन्मान केला. निजामकालीन दस्ताप्रमाणे आरक्षण दिलं. प्रमाणपत्र दिले. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात मिळाले. पहिलं कुणबी प्रमाणपत्र कोणी घेतलं असेल तर स्वत:ला शेतकरी पुत्र म्हणवणाऱ्या एकाने घेतलं. माझ्यासारखा असता तर समाजातील गरिबाला काढून दिलं असतं, असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी सोनवणेंवर निशाणा साधला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
पुष्पाची सिरीज येणार, धनंजय मुंडेंचा चंदनावरुन बजरंग सोनवणेंवर हल्ला, पवारांना म्हणाले, मराठा आरक्षणावर बोला