परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) माझा लहान भाऊ म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांच्याहाती शिट्टी दिली. त्यामुळे, 2 लाखांच्या फरकाने आपला विजय होणार, मी दिल्लीला जाणार असं विश्वासाने सांगणाऱ्या जानकरांचा आत्मविश्वस जिंकतो की ठाकरेंच्या निष्ठावान खासदाराला संधी मिळते. परभणी लोकसभा (Pabhani Loksabha) मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये थेट लढत झाली. येथून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने हवामानाचा अंदाज वर्तवणारे पंजाबराव डख हेही मैदानात होते. मात्र, परभणीतील निवडणूक जानकर विरुद्ध जाधव यांच्यातच प्रामुख्याने लढली गेली. तर, मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभावही या मतदारसंघात पाहायला मिळाला. दरम्यान, एक्झिट पोलच्या आकडेवारीत येथून संजय जाधव यांनाच आघाडी दर्शवण्यात आली होती. आता, प्रत्यक्ष निकालातही संजय जाधवच आघाडीवर आहेत.

महाविकास आघाडीचे परभणीचे उमेदवार संजय जाधव हे 1 लाख 21 हजार मताधिक्याने आघाडीवर असून त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. संजय जाधव यांनी मतमोजणी कक्षाला भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी त्यांचा विजय निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांना त्यांचा सत्कार केला. विशेष म्हणजे रासपाचे एकमेव आमदार असलेले रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात देखील खासदार संजय जाधव यांना लीड आहे. त्यामुळे, याच ठिकाणी आता महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे.

परभणी लोकसभा 5 वी फेरी बंडू जाधव 20,844 मतांनी आघाडीवर

संजय जाधव 

पहिली फेरी 20786
दुसरी फेरी 20904
तिसरी फेरी 20864
चौथी फेरी 20208
पाचवी फेरी 20096
--------------------------
 102858

महादेव जानकर

पहिली फेरी 17612
दुसरी फेरी 15149
तिसरी फेरी 16671
चौथी फेरी 14043
पाचवी फेरी 18539
-------------------------
82014

पाचव्या फेरीअखेर संजय जाधव 20844 मतांनी आघाडी वर

परभणीमध्ये संजय बंडू जाधव यांनी मोठी आघाडी घेतली असून चौथ्या फेरीअखेर  19,283 मतांनी आघाडी घेतली आहे. सध्या 5 व्या फेरीची मतमोजणी सुरू आहे. 

संजय जाधव 

पहिली फेरी 20786
दुसरी फेरी 20904
तिसरी फेरी 20864
चौथी फेरी 20208
--------------------------
 82762

महादेव जानकर

पहिली फेरी 17612
दुसरी फेरी 15149
तिसरी फेरी 16671
चौथी फेरी 14043
-------------------------
63479

संजय जाधव चौथ्या फेरीअखेर 19283 मतांनी आघाडी वर

जगात जर्मनी भारतात परभणी अशी परभणीची ओळख सांगितली जाते. मात्र, मराठवाड्यातील विकासाच्या स्पर्धेत मागास जिल्हा म्हणून परभणीकडे पाहिले जाते. या परभणी मतदारसंघात यंदा महायुतीने रासपचे प्रमुख महादेव जानकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातून त्यांना उमेदवारी दिली. त्यांनतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी जानकर यांच्यासाठी प्रचार केला. मोदींनी माझा लहान भाऊ म्हणत जानकर यांना दिल्लीला पाठवण्याचे आवाहन परभणीकरांना केले होते. मात्र, येथील निवडणुकीत अत्यंत चुरशीची झाली असून अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात 34 उमेदवार रिंगणात होते. मात्र, परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे महादेव जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचे संजय बंडू जाधव यांच्यात प्रमुख लढत झाली. पंजाबराव डख यांनीदेखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निश्चय व्यक्त केल्यामुळे हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला. पंजाबराव डख यांच्या हवामानाचा अंदाज गंभीरपणे घेणारे शेतकरी, सामान्य लोक त्यांना निवडणुकीत मतदान करणार का? अशीही चर्चा होती. मात्र, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या निकालानंतर मिळणार आहेत.

उमेदवाराचे नाव पक्ष विजयी उमेदवारांची मते
संजय (बंडू) जाधव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडी  
महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष  
पंजाबराव डख वंचित बहुजन आघाडी  

परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे 4 आमदार 

परभणी लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे, हा मतदारसंघ परभणी व जालना ह्या दोन्ही जिल्ह्यांचा आहे. या शिवाय जिंतूर, परभणी, पाथरी आणि गंगाखेड या 4 विधानसभा मतदारसंघाचा समावेश परभणी मतदारसंघात आहे. या 6 मतदारसंघांपैकी जिंतूर व परतूर या 2 मतदारसंघात भाजपचे, गंगाखेड मतदारसंघात रासपचे, घनसांगवीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे, पाथरीत काँग्रेसचे आमदार आहेत, तर परभणी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहे. म्हणजेच, भाजप वगळता इतर 4 पक्षाचे एक-एक आमदार आहेत. तर महायुतीचे 4 आमदार असल्याचे दिसते.

परभणी मतदारसघात 62.26 टक्के मतदान

विधानसभा मतदारसंघ   टक्केवारी
जिंतूर      62.43
परभणी      62.62
गंगाखेड     63.00
पाथरी     64.27
परतूर     59.60
घनसांगवी     60.93

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा 

2019 च्या परभणी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे बंडू जाधव हे 42 हजार मताधिक्यांनी निवडून आले होते. या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर होते. बंडू जाधव यांना 5.38 लाख मतं होती तर विटेकरांना 4.96 लाख मतं मिळाली. राज्यात झालेल्या चुरशींच्या निवडणुकांपैकी ही एक निवडणूक ठरली होती. यंदा राजेश विटेकर हे महादेव जानकर यांच्यासाठी प्रचार करत होते. मात्र, येथील मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीय संघर्ष पाहायला मिळाला. स्वत: बंडू जाधव यांनीच याबाबत कबुली दिली. मनोज जरांगे यांचा फायदा मला व बीडमध्ये बजरंग सोनवणे यांना झाल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे, मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा बंडू जाधव यांना झाल्याचे बोलले जाते.  

शिवसेना फुटीनंतर पक्षनिष्ठ कायम

शिवसेना फुटीनंतर संजय जाधव हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे, परभणीतून बंडू जाधव यांनात उमेदवारी देण्यात आली. अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे, त्याचा फायदा निश्चितचपणे त्यांना होऊ शकतो, असं येथील राजकीय तज्ज्ञ सांगतात.

जानकर यांच्यासाठी मोदींची सभा

जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण असलेल्या परभणी जिल्ह्यातून आजही रोजगारासाठी हजारो तरुन स्थलांतर करत आहेत. त्यामुळे, उद्योगधंदे नसणे, बेरोजगारी आणि दुष्काळ हे मुद्दे मतदारसंघात प्रभावीपणे आहेत. त्यातच, महादेव जानकर यांनी मी परभणीत उद्योगधंदे आणील व शेतकऱ्यांसाठी काम करेल असे आश्वासन दिले होते. यंदाही कापूस आणि सोयाबीनला भाव मिळवून देण्याचं आश्वासन येथील जनतेला राजकीय नेत्यांनी दिलं आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महादेव जानकर यांचा माझा लहान भाऊ असा उल्लेख केल्याने जानकर यांचा विजयाचा आत्मविश्वास बळावल्याचं दिसून आलं.