Amol Kirtikar and Gajanan Kirtikar, Mumbai : शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्या पत्नी मेघना गजानन कीर्तिकर (Meghna Kirtikar) यांचे आज पहाटे 3:30 च्या सुमारास अल्पश: आजाराने निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोरेगावमध्ये गजानन कीर्तिकर यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार रवींद्र वायकर सोबत सिद्धेश कदम पोहचले आहेत...त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील अमोल कीर्तिकर यांच्या आईचे अंत्यदर्शन घेतले आहे.
उद्धव ठाकरेंनी घेतले अमोल कीर्तिकर यांच्या आईचे अंत्यदर्शन
उद्धव ठाकरे व गजानान किर्तीकरांची भेट घेतली. गजनान किर्तीकरांच्या पत्नी मेघना किर्तीकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनाला गजानन कीर्तिकर आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. उद्धव ठाकरेंनी माजी खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी आदित्य ठाकरे ,खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, व आमदार सुनिल प्रभु देखील सोबत होते. पक्षात फुट पडल्यानंतर ही पहिलीच भेट झाली.
एकनाथ शिंदे यांनी घेतले गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचे अंत्यदर्शन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गजानन किर्तीकर यांच्याकडे सांत्वनासाठी दाखल झाले आहेत. गजनान किर्तीकरांच्या पत्नी मेघना किर्तीकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना अमोल कीर्तिकरांची (Amol Kirtikar) भेट गजानन कीर्तिकर यांनी करून दिली...भेट घेतल्यानंतर अमोल कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांचा पाया पडले.
उद्धव ठाकरे व गजानान किर्तीकरांची भेट.
गजनान किर्तीकरांच्या पत्नी मेघना किर्तीकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनाला उद्धव ठाकरे आले असताना भेट.
उद्धव ठाकरेंनी माजी खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेत केले सांत्वन
आदित्य ठाकरे ,खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, व आमदार सुनिल प्रभु देखील सोबत
पक्षात फुट पडल्यानंतर ही पहिलीच भेट
Uddhav Thackeray Meghna Kirtikar : गजानन किर्तीकरांच्या पत्नीचं निधन,उद्धव ठाकरेंनी घेतलं अंत्यदर्शन
इतर महत्त्वाच्या बातम्या