अकोला: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील, असं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलंय. मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यावरही सुरेश धस कसे बोलतायेत?, असा सवालही त्यांनी यावेळी केलाय. अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी कालच्या परभणीतल्या मोर्चातील सुरेश धस यांच्या भाषणावरही टीका केलीय. अजित पवारांवरची टीका आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी सुरेश धसांना दिलाय.
विरोधक धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करताय- अमोल मिटकरी
दरम्यान मस्साजोग प्रकरणात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय. सुरेश धसांना आता मुख्यमंत्र्यांनीच आवर घालावा, अशी मागणी त्यांनी केलीये. तर या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांऐवजी विरोधक धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करीत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान, आपल्याला सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा गंभीर आरोप यावेळी अमोल मिटकरी यांनी केलाय.
देवेंद्र फडणवीसजी (Devendra Fadnavis) आपल्या पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात 'क्या हुआ तेरा वादा अजितदादा' अशा प्रकारे वक्तव्य करून आदरणीय अजितदादांविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार, की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? असा सवाल करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) जाब विचारला आहे. आमदार अमोल मिटकरींनी एक्सवर पोस्ट करत हा प्रश्न विचारला आहे. परिणामी भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी आक्रमक झाली झाली असून आमदार सुरेश धस यांची दखल घेण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याचे बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे याचं मुद्यावरून आमदार सुरेश धसांना परत एकदा अमोल मिटकरींवर तोफ डागली आहे.
नेमकं काय म्हणाले होते सुरेश धस?
ज्या पद्धतीने यांनी संतोषला मारले ती कोणती पद्धती आहे? छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येप्रमाणेच ही हत्या झाली आहे. त्या लेकराने काय बिघडवले होते? आकाचे आका करलो, जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी, असा जोरदार हल्लाबोल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. तर अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काल (4 जानेवारी) परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या सभेतून सुरेश धस बोलत होते.
आणखी वाचा