नांदेड : भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांना आज मराठा आंदोलकांनी अडवले. भोकर विधानसभा मतदारसंघातील गणपूर येथे आज हा प्रकार घटला. भोकर विधानसभेतून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी चव्हाण कुटुंबीयांचे गावोगावी भेटीगाठी सुरू आहेत. दरम्यान आज माजी आमदार अमिता चव्हाण ह्या अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे गावभेटीसाठी गेल्या होत्या. परत येताना त्यांना मराठा आंदोलकांनी अडवले. आता तुम्ही भाजपात आहात , मराठा आरक्षणासाठी तुमची भुमिका काय असा जाब मराठा अंडीलकाने विचारला. यापूर्वी श्रीजया चव्हाण यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.


अशोक चव्हाणांनाही अनेकदा रोषाचा सामना करावा लागलाय 


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. भाजपकडून ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यात आलाय. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार अशी भूमिका भाजपकडून सातत्याने मांडण्यात आलीये. त्यामुळे भाजप नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 


लोकसभा निवडणुकीतही फटका 


लोकसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दा अशोक चव्हाण यांच्या स्थानिक मतदारसंघ असलेल्या नांदेडमध्ये गाजला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी बाजी मारली होती. 2014 मध्ये प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. मात्र, या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण सोबत होते, तरिही प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाला सामोरे जावे लागेल. 


मराठा आरक्षणासाठी आपण गप्प का?, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे प्रश्न करत मराठा बांधवांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली होती. यावेळी, अशोक चव्हाण यांनी काही वेळ आपली सभा थांबवून त्यांच्याशी संवाद साधला होता.   


इतर महत्वाच्या बातम्या 


Parinay Phuke on Anil Deshmukh : अनिल देशमुखांना मिळालेला जामीन रद्द करावा, पुन्हा तुरुंगात टाकावं : परिणय फुके