Parinay Phuke on Anil Deshmukh, मुंबई : "अनिल देशमुख (Anil Deshmukh) मागील 7 ते 8 दिवसांपासून आरोप करत आहेत. ते फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच नाही तर राज्य आणि केंद्र सरकारवर देखील आरोप करत आहेत. ईडी सीबीआयवरही आरोप करत आहेत. त्यासोबतच देशाच्या न्यायालयांवरही आरोप करत आहेत. 12 महिने ते जेलमध्ये होते, तेव्हा त्यांनी अनेकदा न्यायालयात जामीन अर्ज केला, पण त्यांना जामीन मिळतं नव्हता. 1 वर्षाआधी त्यांना जामीन मिळाला, तेही मेडिकलच्या कारणास्तव मिळालाय. मात्र, आता निवडणुकांमध्ये फिरत आहेत. माझी मागणी आहे की, त्यांना मेडिकल कारणास्तव मिळालेला जामीन रद्द करावा आणि त्यांना तुरुगांत टाकावं", असं भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके (Parinay Phuke) म्हणाले. मुंबईत (Mumbai) आमदारकीची शपथ घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. 


परिणय फुके म्हणाले, मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या असंविधानिक आहेत. त्यांच्या मागण्या कायद्यामध्ये कुठेही बसत नाहीत. कोणाचेही राज्य सरकार आणि केंद्र सरकार जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करु शकणार नाहीत. जरांगे पाटलांचा मूळ उद्देश मराठा समाजाला आरक्षण देण्याचा नाही. त्यांना ओबीसी आणि मराठा समाजात वाद लावायचा आहे. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं. ते उच्च न्यायालयामध्ये टिकवलंही होतं. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे ते आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर परत आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ईडब्लूएसमधून आरक्षण दिलं.


अनिल देशमुखांनी कोणते आरोप केले होते?


अनिल देशमुख म्हणाले होते की,  मला उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असं आरोप करण्यास सांगण्यात आलं होतं. मी तो आरोप केला नाही. तसेच आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियानवर बलात्कार करून बाल्कनीतून ढकलून दिल्याचा आरोप सुद्धा करण्यास सांगण्यात आले, पण मी ते आरोप केले नाहीत, असा सनसनाटी दावा महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांनी केला होता. 


फडणवीसांच्या खास माणसाकडून मला शासकीय निवासस्थानी ऑफर होती


देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या एका खास माणसाने मला तीन वर्षांपूर्वी ही ऑफर दिली होती. माझ्या शासकीय निवासस्थानीच ही ऑफर मला देण्यात आली होती असा दावाही अनिल देशमुख यांनी केला. ही ऑफर मला देण्यात आली त्या संदर्भातले भक्कम पुरावे माझ्याकडे असून मी योग्य वेळी ते समोर आणेन, असं अनिल देशमुख म्हणाले होते. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी केलेले आरोपांमध्ये तथ्य असल्याचेही सांगितले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Anil Deshmukh on Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी पैसे मागितल्याचा, आदित्यने बलात्कार केल्याचा आरोप करण्यास सांगितला; अनिल देशमुखांचा सनसनाटी दावा