Manoj Jarange Patil on Sharad Pawar :"मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोगडा काढण्यासाठी सरकारने लक्ष्मण हाके, छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांना एकत्रित करुन निर्णय घ्यावेत आणि बैठक घ्यावी", असा मार्ग राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुचवला होता. आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
मनोज जरांगे पाटील काय काय म्हणाले?
शरद पवार काय म्हणातात त्यापेक्षा माझं मन, माझी नियत, माझे विचार, माझे संस्कार नेमके काय सांगतात ते अतिशय महत्वाचं आहे. मला वाटतं मराठ्यांचं कल्याण व्हावं, गोरगरिबांचं कल्याण व्हावं. तसंच लिंगायत समाजाचंही कल्याण व्हावं. गोरगरीब धनगरांनाही आरक्षण मिळायला पाहिजे. कैकाडी आणि राजपूत समाजाचाही प्रश्न आहे, त्यांनाही आरक्षण मिळायला पाहिजे. ती माझी प्रामाणिकपणाची भावना आहे.
शरद पवार काय काय म्हणाले होते?
सरकारने डायलॉग करायला पाहिजे होता, तो केलेला नाही. असं चित्र दिसतंय की, जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद ठेवत आहेत. ती चांगली गोष्ट आहे. दुसरे घटक आहेत जे त्यांना विरोध करत आहेत, त्यांच्याशी सरकारमधील दुसरे लोक संवाद ठेवत आहेत. हे कशासाठी? दोघांनाही सर्वांना विश्वासात घ्यायला हवं.
सरकारशी चर्चा बंद आहेत : मनोज जरांगे पाटील
सरकार फक्त आरक्षण देऊ देऊ असं म्हणत आहे. आमचं म्हणणे ईडब्लू सुरू ठेवा. सरकारने जे करायचं ते स्पष्टपणे करावे. कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळ लागत आहे. त्याला देखील वॅलिडिटी वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारशी चर्चा नाही, सध्या सर्व बंद आहे. पावसामुळे नेट बंद आहे. तसेच उद्यापासून बैठका घेणार असून पाडल्याशिवाय पर्याय नाही. समीकरण जुळवावे लागणार आहे. आमची धग मराठवाड्यापुरती नाही असे सांगत मुंबईतदेखील आमदारांना बसणे कठीण झाले आहे. असे सांगत सत्ताधारी आणि विरोधी दोघांची जबाबदारी आहे. दोघेही एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे.... दुसऱ्याच्या गळ्यात लफडं गुंतवण देण्याची सवय राजकारणी यांची आहे..एकमेकांवर ढकलने दोघांना परवडणार नाही, एक झटका लोकसभेत दिला आहे. असे मनोज जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या