एक्स्प्लोर

Amit Thackeray: एकनाथ शिंदेंनी आधीच 25 कोटी रुपये दिलेत; अमित ठाकरेंच्या विधानावर समाधान सरवणकरांचं विधान

Amit Thackeray Sada Sarvankar: समाधान सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना अमित ठाकरेंना टोला लगावला. 

Amit Thackeray Mahim Vidhan Sabha: माहीम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून माहीम विधानसभेची चर्चा रंगली आहे, कारण याच मतदारसंघातून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत.

अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने सदा सरवणकर यांच्यावर आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. मात्र मी उमेदवारी अर्ज भरणार, निवडणूक लढवणार आणि जिंकणार, असा विश्वास सदा सरवणकर यांनी बोलावून दाखवला. याचदरम्यान सदा सरवणकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना अमित ठाकरेंना टोला लगावला. 

आमच्या पाठिंब्याच्या चर्चा या फक्त मीडियातच होत्या. आमचं तर पहिल्या यादीत नाव होतं. आम्ही तयारीही केली होती. अमित ठाकरे म्हणत आहेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मूळात ते नवीन आहेत. त्यांना अजून शिकायला फार वेळ आहे. या मतदार संघात अनेक वर्ष शिवसेनेचा भगवा हा डौलाने फडकत आहे.  यंदाच्या निवडणुकीत देखील भगवा फडकेल, असा विश्वास समाधान सरवणकर यांनी बोलून दाखवला. तसेच सदा सरवणकर यांनी माहीमधील अनेक प्रश्न सोडवले आहेत, असं समाधान सरवणकर यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी 25 कोटी रुपये जाहीर केले आहेत- समाधान सरवणकर

माहीममधील प्रश्न जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये जावं लागतं आणि आता ते लोकांमध्ये 100 टक्के जातील अशी खात्री आहे. तसेच निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम दादर-माहीममधील समुद्रकिनाऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार, असं अमित ठाकरेंनी सांगितले. यावर देखील समाधान सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली. फक्त समुद्रकिनारा साफ करुन होणार नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनऱ्यासाठी आधीच यासाठी 25 कोटी रुपये जाहीर केले आहेत, ते काम देखील सुरु झालंय, अशी माहिती समाधान सरवणकर यांनी दिली. 

राज ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं काम- दीपक केसरकर

दरम्यान, माहीम विधानसभेतून मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. अमित ठाकरे रिंगणात उतरल्याने महायुतीमधील अनेक नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत भूमिका मांडली आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला एकही जागा न घेता महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आमचेही कर्तव्य आहे की, अमित ठाकरे यांना पाठिंबा देणे. मात्र, तिथे आमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याशी बोलणे सुरू आहे. त्यांचा योग्य तो मान राखून सन्मान दिला जाईल. या ठिकाणी तोडगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काढणार आहेत. अमित ठाकरेंना पाठिंबा देणं काम आहे, राज ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं काम आहे, असं विधान मंत्री दीपक केसरकर यांनी केलं. दीपक केसरकरांच्या या विधानामुळे महायुती अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का?, तसेच सदा सरवणकर निवडणुकीतून माघार घेणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Video: अमित ठाकरे नवीन, त्यांना शिकायला अजून वेळ- समाधान सरवणकर

संबंधित बातमी:

Amit Thackeray: राज ठाकरेंचा 'छावा'; माहीमच्या नवनिर्माणाची आस घेऊन पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अमित ठाकरेंची संपत्ती किती?

महत्त्वाच्या बातम्या

Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Pune Chakan MIDC: खड्ड्यांमुळे चाकण MIDC चे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
खड्ड्यांमुळे चाकण MIDCचे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
Manoj Jarange Patil: सत्तेतील एकनाथ शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी, मनोज जरांगेंचं टीकास्त्र
सत्तेतील एकनाथ शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी, मनोज जरांगेंचं टीकास्त्र
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget