अमरावती : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अमरावती येथील सभेचा मंडप कोसळला आहे. अमरावती (Amravati Lok Sabha Election 2024) येथील अमित शाह यांच्या सभास्थळावरील मंडपाचा (Amit Shah Rally Pavilion) काही भाग कोसळला आहे. भाजपच्या सभा मंडपाचा काही भाग वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे. उद्या अमित शाह यांची अमरावती येथे सभा होत आहे. या सभास्थळाच्या परवानगीवरून एकीकडे बच्चू कडू आक्रमक झाले असताना दुसरीकडे या अमित शाहांच्या सभेचा मंडप कोसळला आहे.


अमित शाहांच्या सभेचा मंडप कोसळला


अमरावतीतील सायन्सकोर मैदानावर अमित शाह यांच्या सभेची तयारी सुरु आहे. दरम्यान, मुख्य मंडपाच्या बाजूचा मांडव वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे. या मैदानाबाहेर बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते ठिय्या मांडून आहेत. मैदानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बच्चू कडू  यांनूी या मैदानावर सभेसाठी परवानगी घेतली असताना ऐन वेळी बच्चू कडू यांना मैदानावर जाण्यापासून अडवण्यात आलं. यानंतर बच्चू कडू आक्रमक झाले असून ते ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत.


हनुमानजींनी काम दाखवलं, एका झटक्यात मंडप पाडला


हनुमानजींनी काम दाखवलं, एक लाथ मारली आणि मंडप पाडला. त्यांची चालीसा पण चुकीची होती, राजकीय होती, तुमची ही जबरदस्ती सुरु आहे, त्यावर हनुमानजीही बोलत आहेत, हे नाही चालणार. देव आमच्यासोबत आहे. इथे कायदा काही राहिलेला नाही. पोलीस अधिकारी भाजपसारखे बोलत आहेत. आम्हाला भाजपचं ऐकावं लागेल असं पोलीस सांगत असल्याचं बच्च कडू यांनी म्हणलं आहे. 


बच्चू कडू आणि राणा यांच्या सभास्थळाचा वाद


अमरावती येथील सायन्सस्कोर मैदानावर बच्चू कडू यांनी सभेसाठी परवानगी मिळवली होती. त्यानंतर आता त्याच सभास्थळावर अमित शाह यांची सभा होत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी बच्चू कडू यांची परवानगी काढून घेण्यात आली. यानंतर बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मैदानाच्या परवानगीवरुन बच्चू कडू यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची झाली.


बच्चू कडूंना रवी राणांवर आरोप


अमित शाह अमरावतीत येत असताना, त्यांनाही माहित नसेल की, रवी राणा भाजपला बदनाम करत आहे. भाजपसारखा शिस्तबद्ध पक्ष रवी राणा यांच्या ताब्यात गेल्यामुळे संस्कार, कायदा मोडून हे, सर्व चालू आहे.  आम्ही पैसे भरले परवानगी घेतली. 23-24 साठी मैदाना आमच्या ताब्यात आहे, 18 तारखेला आम्ही पैसे भरले आणि आमच्याच घरातून हाकलण्यासाठी आता पोलीस प्रशासन काम करत आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.


पाहा व्हिडीओ : बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...