मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या (BJP)  उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात  (Loksabha BJP Election Campaign) प्रचाराचा जोरदार धडाका उडणार आहे. दोनच दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींची विदर्भात आज दुसरी सभा आहे. आता मोदीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तोफ महाराष्ट्रात (Amit Shah in Maharashtra) धडाडणार आहे. उद्या नांदेडमध्ये अमित शाहांची जाहीर  सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , खासदार अशोक चव्हाणांसह   भाजपचे आणि महायुतीचे इतर नेते  उपस्थित राहणार आहेत. नांदेड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी येणार आहे.


नांदेड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नरसी गावात संध्याकाळी पाच  वाजता सभेचं आयोजन करण्यात आले आहे.  देशाच्या राजकारणात गेल्या दहा वर्षांत अमित शहा यांचे नाव सर्वाधिक चर्चेत राहिले.मागील लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये अमित शहा यांनी चाणक्याची भूमिका बजावली. या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळले. महाराष्ट्रातील निवडणुकीतही प्रचारात अमित शहा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेऊन वातावरण निर्मिती केली होती.  


प्रचारकांच्या यादीत 26 जणांचा समावेश 


 पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह (Amit Shah), जेपी नड्डा (JP Nadda) तर महाराष्ट्रातील नितीन गडकरी (Nitin Gadkari), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विनोद तावडे (Vinod Tawade) यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपच्या प्रचार प्रमुखांच्या (Election Campaign) यादीत 26 जणांचा समावेश आहे.   


राज्यात सभांचा धुरळा उडणार


राज्यात 45 पारचा नारा देत भाजपने जोरदार प्रचार मोहीम आखली आहे. त्यामुळे आगामी काळात  राज्यात सभांचा धुरळा उडणार आहे.  राज्यातील  जनतेपर्यंत पोहोचण्याचे उदिष्ठ भाजपने ठेवले आहे. यासाठी भाजपने  वक्त्यांची फौज तैनात केली  आहे. भाजपच्या प्रचार  प्रमुखांच्या यादीत 7 केंद्रीय मंत्री, 6 मुख्यमंत्री, खासदार, प्रदेशाध्यक्ष प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. विदर्भात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान असल्याने तेथे प्रचार मोहीम लवकरच सुरू झाल्या आहेत. मोदी कार्यकाळाच्या आधीचा देश व मोदींच्या कार्यकाळातील देश यावर लोकांची जनजागृती केली जाणार आहे. देशातील सर्व वर्गासाठी सरकारने काय केले, याचा पाढा वाचला जाणार आहे.


हे ही वाचा :


PM Modi at Ramtek: पंतप्रधान आज रामटेक दौऱ्यावर; शिंदेंच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार