Mahayuti Meet With Amit Shah : नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकांचं (Vidhan Sabha Nivadnuk 2024) बिगुल वाजलं आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पण सध्या दोन्ही आघाड्यांकडून जागावाटपाचा तिढा सोडवण्याचं काम सुरू आहे. अशातच शुक्रवारी रात्री केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीतील (Mahayuti) नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात जागावाटपाचा तिढा सोडवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 


महायुतीतल्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती मिळत आहे. महायुतीच्या जागांबाबत दिल्लीत अमित शाहांच्या समक्ष चर्चा झाली. अमित शाहांसोबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची अडीच तास चर्चा झाली. तिनही नेत्यांनी जागावाटपाचा तिढा सोडवला असल्याची माहिती आहे. आता केवळ काही जागांचाच प्रश्न बाकी आहे, अशी माहिती दिल्लीतून समजतेय.


अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीतील इनसाईड स्टोरी ABP माझावर


दिल्लीत अमित शहांसोबत पार पडलेल्या बैठकीत जास्तीत जास्त जागांचा आग्रह धरलेल्या अजित पवारांनी आपल्या आग्रह सोडावा यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. अन्य राजकीय पुनर्वसनात जास्तीचा लाभ देण्याचं अजित पवारांना आश्वासन देण्यात आलं आहे. येत्या दोन दिवसांत महायुतीचे नेते एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करणार आहेत. 


आधी ठरलेला भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला? 



  • भाजपचा किमान 150 जागांवर आग्रह 

  • एकनाथ शिंदेंचा 87-90 जागांवर आग्रह 

  • अजित पवारांचा किमान 60 जागा लढण्याचा आग्रह 


महायुतीचा अंतिम फॉर्मुला काय? 



  • भाजप : 151

  • शिवसेना : 84

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 53  


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला 150-155 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 80-85 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 50- 55 जागा मिळू शकतात.


पाहा व्हिडीओ : Ajit Pawar Tryambakeshwar : काल दिल्लीत बैठक, आज दादा देवदर्शनाला; महादेवाकडे काय साकडं घातलं?



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?