मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना ठाकरे गटाची (Shiv Sena UBT) येत्या दोन ते तीन दिवसात उमेदवारांची पहिली यादी (Shiv Sena Candidate List) जाहीर होणार आहे. पहिल्या यादीमध्ये साधारणपणे 60 ते 70  उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात. यामधील बहुतांश  उमेदवारांना  तयारी करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत तर काहीजणांना लवकर एबी फॉर्म घेऊन जाण्याचे सुद्धा सांगितले गेले आहे.  


ज्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे अशा 32 जणांच्या संभाव्य उमेदवारांची माहिती एबीपी माझाला  मिळाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 32 संभाव्य उमेदवार ज्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. यातील दोन ते तीन उमेदवारांसंदर्भात पुनर्विचार चालू आहे. जिथे येत्या दोन दिवसात निर्णय घेऊन उमेदवारी जाहीर केली जाईल. 


शिवसेना ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य 32 उमेदवारांची यादी 


१) आदित्य ठाकरे - वरळी 
२) अजय चौधरी - शिवडी( सुधीर साळवी इच्छुक) पुनर्विचार होणार 
३) राजन साळवी - राजापूर 
४) वैभव नाईक - कुडाळ 
५) नितीन देशमुख- बाळापूर 
६) सुनिल राऊत - विक्रोळी 
७) सुनिल प्रभू - दिंडोशी 
८) भास्कर जाधव - गुहागर 
९) रमेश कोरगावंकर - भांडुप पश्चिम 
१०) प्रकाश फातर्फेकर - चेंबूर / (अनिल पाटणकर इच्छुक) पुनर्विचार होणार  
११) कैलास पाटिल - धाराशिव 
१२) संजय पोतनीस - कलिना 
१३) उदयसिंह राजपूत - कन्नड 
१४) राहुल पाटील - परभणी 
१५) ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व 
१६) वरुण सरदेसाई - वांद्रे पूर्व 
१७) स्नेहल जगताप - महाड मतदारसंघ
१८) सुधाकर बडगुजर - नाशिक पश्चिम
१९)अद्वय हिरे - मालेगाव बाह्य नाव आघाडीवर
२०) नितीन सावंत - कर्जत मतदारसंघ
२१) अनिल कदम - निफाड
२२) दीपेश म्हात्रे -डोंबिवली 
२३)सुभाष भोईर - कल्याण ग्रामीण 
२४)मनोहर भोईर - उरण 
२५) किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य 
२६)राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम 
२७) दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
२८)कन्नड मतदारसंघ  - उदयसिंह राजपूत
२९) सुरेश बनकर- सिल्लोड  मतदारसंघ - 
३०) राजन तेली - सावंतवाडी 
३१) दीपक आबा साळुंखे - सांगोला 
३२ )विनोद घोसाळकर / तेजस्वी घोसाळकर - दहिसर   


मविआच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय आजच?


दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटप अंतिम निर्णय आजच होणार आहे. उर्वरित तिढा असलेल्या जागांवर  काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात होणाऱ्या बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तिढा असलेल्या जागांचा प्रश्न मिटला आहे.  त्यामुळे उर्वरित दहा ते 15 जागांवर आज  शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस  यांच्या बैठकीत  तोडगा काढून  जागावाटप फायनल केले जाणार आहे. 


Uddhav Thackeray Shiv Sena probable candidate list : उद्धव ठाकरेंचे संभाव्य 32 उमेदवार



 


संबंधित बातम्या 


ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?