नागपूर : विधानपरिषदेतील (Maharashtra Vidhan Parishad) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मंत्री आणि भाजप आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्यावर भ्रष्टचाराचा आरोप केला. यानंतर  मंगलप्रभात लोढा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहात थेट कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. आपण कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम करत नसल्याचं तसेच जर आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा असं जाहीर आव्हान लोढा यांनी केलं.


अंबादास दानवे यांनी देखील आपण पुरावे सादर करत असल्याचं जाहीर करत, प्रतिआव्हान दिलं. यावर विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी आमदार खिशात राजीनामा घेऊन फिरतात मात्र कुणीच राजीनामा देत नाही, असा टोमणा लगावला. 


अंबादास दानवे म्हणाले, "मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाच्याही जमिनी घ्यायच्या. मुंबईत जमिनी, ठाणे, कल्याण, भिवंडीत जमिनी घेतल्या", असं अंबादास दानवे म्हणाले. यानंतर लोढा यांचं नाव आपण मागे घेत असल्याचं दानवे म्हणाले. पण लोढा यांचं नाव न घेता, दानवे यांनी त्यांचा मुंबईचे पालकमंत्री असा उल्लेख करत, आरोपांच्या फैरी चालूच ठेवल्या. 


दानवे म्हणाले, "भाजपचे एक नेते, मुंबईचे पालकमंत्री यांचं अनेक ठिकाणी महापालिकेने अवैध बांधकाम, त्याची विक्री चालू आहे. भाजप उघड्या डोळ्याने हे बघत आहे" 


तक्रारी तुमच्याकडे पाठवतो


लोढा यांच्याविरोधात आमच्याकडे तक्रारी येत आहेत त्या तक्रारी मी तुमच्याकडे पाठवतो तुम्ही याबाबत निर्णय घ्या, असं दानवे सभापती नीलम गोऱ्हेंना म्हणाले.


यावर नीलम गोऱ्हे  "मंगल प्रभात लोढा तुम्ही राजीनामा देऊ नका. अंबादास दानवे यांचे जे आरोप आहेत ते संबंधित यंत्रणेला पुरावे सादर करतील. तुम्ही मंगल प्रभात लोढा यांच्याकडे जाणं सोडू नका. तुम्ही जात राहा" असं म्हणाल्या.


कोऱ्या चिठ्ठीवर राजीनामा लिहून देतो : लोढा


मी 10 वर्षांपासून मी माझ्या कुटुंबाच्या व्यवसायात नाही. जर माझ्या कुटुंबियांकडून अवैध व्यवसाय होत असेल तर मी कोऱ्या चिठ्ठीवर राजीनामा लिहून आणला आहे. एकही अनधिकृत बांधकाम केले नाही. आम्ही अनधिकृत व्यवसाय करत नाही.पदाचा मी गैरवापर करत नाही, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.
 
अंबादास दानवेंनी आरोप केल्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत  राजीनाम्याचे पत्र काढले.


मी पुरावे द्यायला तयार : अंबादास दानवे


 यावर अंबादास दानवे यांनी त्यांची तयारी असेल तर मी पुरावे द्यायला तयार आहे.माझ्याकडे तक्रारी आल्यावर त्या मी मांडल्या आहेत, असं सांगितलं.


लोढा म्हणाले, तुम्ही पुरावे द्या, मी येतो. काय चाललंय...कुणी 1 रूपयाचा माझ्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. नेहमी असा आरोप केला जातो.


मग सभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कुणी राजीनामा बाहेर काढत नाही, पण लोढासाहेब तुम्ही राजीनामा बाहेर काढलात. तुम्ही राजीनामा देवू नका. संबंधित यंत्रणेकडे तक्रार करा दानवेजी.   


Mangal Prabhat Lodha Speech VIDEO :  मंगलप्रभात लोढा आक्रमक, सभागृहात नेमकं काय घडलं?



 


संबंधित बातम्या