नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde at RSS Headquarter) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS Founder)   संस्थापक डॉ. हेडगेवार (K B Hedgewar)  यांच्या स्मृतीस्थळी (Dr.Hedgewar Smarak) जाऊन अभिवादन केलं. रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतीस्थळाच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना आमदार भरत गोगावले आणि अन्य नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. 


मुख्यमंत्री म्हणाले, "हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये (Maharashtra Winter Session) असताना रेशीमबागमध्ये भेट देऊन हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेत असतो. परिसर चांगला आहे इथे शांती मिळत. इथे येण्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यात काही राजकरण आहे असे तुम्हाला वाटते का? आमचं हिंदुत्व विकासाचं आहे. सबको साथ लेकर चलना असं पंतप्रधानदेखील सांगतात."


..म्हणून लोकांचं प्रेम मिळतं 


आमचं सरकार हे सामान्य माणसाचं सरकार आहे, सामान्य माणूस कधी पण मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. मी सामान्य माणूस म्हणून काम करतो म्हणून लोक मला प्रेम करतात, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


महाविकास आघाडीने बंद केलेल्या योजना पुन्हा सुरू केल्या : मुख्यमंत्री


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजना मविआ सरकारने बंद केल्या होत्या. त्याआम्ही पुन्हा सुरू केल्या. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. अन्य राज्यांपेक्षा वेगळं आहे. इथे सगळे जातीपातीचे लोक एकत्र राहतात. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही आमची भूमिका आहे. जनतेच्या भावना लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लोकांच्या सेवेची प्रेरणा घेऊन येथून जाणार आहोत, आम्हाला काय मिळाले यापेक्षा आम्ही देशाला काय देणार हा विचार हेडगेवार यांनी दिला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराला  दुसरी भेट


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले.  त्यानंतर संघ कार्यालयात उपस्थित पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराला ही दुसरी भेट आहे.


 



 


हे ही वाचा :


दिल्लीतल्या मंदिराचं स्मशान करुन, तुम्ही अयोद्धेत जाऊन पुजा करणार असाल, तर तो राम तुम्हाला पावणार नाही; संजय राऊतांनी फटकारलं