Ambadas Danve on Sadashiv Lokhande, Shirdi Loksabha : "महाराष्ट्र हा निष्ठावंतांचा आहे. महाराष्ट्र खंडोबा खोपडे आणि सूर्याजी पिसाळासारख्या गद्दारांचा नाही. शिंदे गटाचा शिर्डीचा उमेदवार सूर्याजी पिसाळाची अवलाद आहे", अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली. शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रचारसभा घेतली. नेवासा तालुक्यातील सोनई येथे मविआची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, आमदार सुनील शिंदे, आमदार नितीन देशमुख यांची उपस्थित होते. अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) यावेळी बोलताना भाजपवर चौफेर टीका केली. 


मशाल विशाल विजय घेऊनच पुढे जाणार


अंबादास दानवे म्हणाले, मशाल विशाल विजय घेऊनच पुढे जाणार आहे. उध्दव ठाकरेंवर टीका करण्यासाठी प्रधानमंत्र्यांना एव्हढ्या सभा घ्याव्या लागतात. हेच आपले यश आहे. देशभरात भाजपच्या जागा कमी होणार आहेत. मात्र 400 पार हा माईंड गेम आहे. देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. आम्हाला राम विरोधी म्हणतात,आम्ही रामाच्या नाही, तर ह** लोकांच्या विरोधात आहोत, असंही अंबादास दानवे यांनी सांगितलं. 


पळ म्हणायचे आणि पाय बांधून ठेवायचे


पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, कांदा निर्यातीला परवानगी दिली. मात्र, त्यावर अबकारी कर लावला. पळ म्हणायचे आणि पाय बांधून ठेवायचे, अशी सरकारची कामगिरी आहे. अभिजित पाटील मविआच्या सभेत असताना त्याच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्याने फडणवीसांची भेट घेतली. तिसऱ्या दिवशी भाजपात प्रवेश केला आणि त्याच कारखान्यावर सभा झाली. हे भाजपच्या बापाचे राज्य आहे का? असा सवालही दानवे यांनी केला. 


केंद्रात आणि राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय करणारे सरकार 


नरेंद्र मोदी म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी आहे. खाऊंगा ना खाने दुंगा म्हणतात, मात्र भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेतले. अजित पवारांवर 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. अजित पवारांच्या हाती आज मात्र त्याच महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी दिली. इलेक्ट्रोल बाँडचा घोटाळा केला. नरेंद्र मोदीच्या नावाने खोट्या घोषणा केल्या जात आहेत. केंद्रात आणि राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय करणारे सरकार आहे, असेही दानवे यावेळी बोलताना म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


महाराष्ट्रात मोदींच्या सभा वाढल्या, विजयाबद्दल साशंक आहात का?; फडणवीसांचं उत्तर, सांगितलं किती जागा जिंकणार