'ज्यांच्यावर खटला चालला ते कुठे आहेत?'; अंबादास दानवेंचा अयोध्यापती प्रभू रामचंद्रांना पत्र
Ambadas Danve : 'ज्यांच्यावर खटला चालला ते कुठे आहेत?' असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अयोध्यापती प्रभू रामचंद्रांना पत्र लिहले आहे.
Ayodhya Ram Mandir Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे देशभरात मोठ्या आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, बाबरी प्रकरण न्यायालयात सुरु असतांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेकांवर खटला चालला होता. मात्र, 'ज्यांच्यावर खटला चालला ते कुठे आहेत?' असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अयोध्यापती प्रभू रामचंद्रांना पत्र लिहले आहे.
अंबादास दानवेंचा अयोध्यापती प्रभू रामचंद्रांना पत्र....
प्रति,
अयोध्यापती प्रभू श्री. रामचंद्र
आज सोन्याचा दिवस आहे. प्रत्येक हृदयात वास करणारे आपण आज आपल्या घरात प्रवेश करत आहात. आपला देश या प्रवेशाची वाट पाहत होता. ही वाट काही काल-परवा पासून पाहिली गेली नाही. साधारण 500 वर्षांपासून हा घोर मनाला लागून होता, ज्याला आज पूर्ण विराम मिळतो आहे.
आपल्यासाठी लढे देणारे लोक, अगदी 1885 साली पहिला खटला दाखल करणारे महंत रघुवरदास, 16 जानेवारी 1950 पासून न्यायालयीन लढाई लढणारे ठाकूर गोपाल सिंग विशारद, रामचंद्र परमहंस ते प्राण देणारे कोलकात्याच्या कोठारी बंधू आणि असंख्य रामभक्त आठवतात. ज्यांनी राम जन्मभूमी आंदोलनाची ज्योत आपल्या प्राणाची आहुती देऊन तेवत ठेवली.
30 सप्टेंबर 2020 रोजी बाबरी प्रकरणाचा निवाडा विशेष न्यायालयाने केला. हा निकाल हाती येई पर्यंत ज्यांच्यावर खटला चालला अश्या 49 जणांपैकी 17 जणांना देवाज्ञा झाली होती. यात वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तेजोमय नावही होते. या उर्वरित 32 जण ज्यांच्यावर खटला चालला त्यात प्रामुख्याने नावे घेता येतील त्या उमा भारती, मुरली मनोहर जोशी होते. शिवाय विनय कटीयार, विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया आदी नावे आजही आहेत. पण कुठे आहेत, हा सवाल आज खऱ्या राम भक्तांना पडल्याशिवाय राहत नाही.
आपल्या अयोध्येतील घरापासून साधारण 800 किमी अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशनवर उभे असल्याचे फोटो दाखवण्याचा आटा-पिटा करणारे लोक आपणच सर्वात मोठे रामभक्त असल्याचे दाखले देत फिरत आहेत. बाकी आपल्या या आजच्या सोहळ्याला बॉलिवूडसह उद्योग, खेळ जगतात ज्यांना मोठा 'फॉलोअर' वर्ग आहे, असे हजारो लोक आज आपल्या दरबारापुढे हजर आहेतच. याचीही नोंद आपण घ्यालच, यात तिळमात्र शंका नाही.
जय श्री राम!
रामभक्त
अंबादास दानवे
प्रति,
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 22, 2024
अयोध्यापती प्रभू श्री. रामचंद्र
आज सोन्याचा दिवस आहे. प्रत्येक हृदयात वास करणारे आपण आज आपल्या घरात प्रवेश करत आहात. आपला देश या प्रवेशाची वाट पाहत होता. ही वाट काही काल-परवा पासून पाहिली गेली नाही. साधारण ५०० वर्षांपासून हा घोर मनाला लागून होता, ज्याला आज पूर्ण विराम… pic.twitter.com/701qlJEd5p
इतर महत्वाच्या बातम्या: