मुंबई : ठाकरे गटातील (Thackeray Group) आणखी एक दिग्गज नेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. अंबादास दानवे (Ambadas Danve) ठाकरे गट सोडण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंबादास दानवे महायुतीत जाण्याची चर्चा असल्याने असे झाल्यास मराठवाड्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, अंबादास दानवे ठाकरे गट सोडण्याची चर्चा रंगली असताना उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर करत अंबादास दानवे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.


उद्धव ठाकरेंचा फोटो शेअर करत फेसबुकवर पोस्ट


ठाकरे गटाचे मराठवाड्यातील मोठा नेता महायुतीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. अंबादास दानवे नाराज असून ठाकरेंची साथ सोडणार असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  उद्धव ठाकरेंचा फोटो शेअर करत अंबादास दानवे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये अंबादास दानवे यांनी लिहिलं आहे की, 'याचना नहीं अब रण होंगा...'


अंबादास दानवेंची फेसबुकवर पोस्ट चर्चेत



फेसबुक पोस्टवर अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण


आपण स्वत: रणांगणात उतरणार असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरे साहेबांचे विचार आणि पक्षाचे विचार मजबूत करण्यासाठी मला रणांगणात उतरायला हवं असं वाटतं. लोक पक्षाविषयी काहीही सांगतात, भाजपला मॅनेज झाले, असं काहीही सांगतात. पण आम्ही शिवसेना काय भीक मागणारी आहे का, शिवसेना लढणारी शिवसेना आहे. शिवसेना लढेल आणि जिंकेल, असं रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.


महायुतीत जाण्याच्या चर्चांवर अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण


अंबादास दानवे ठाकरेंची साथ सोडून महायुतीत जाणार अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्या होत्या. या बातम्यांमध्ये कोणतही तथ्य नसल्याचं दानवेंनी सांगितलं आहे. चॅनेल फक्त त्यांच्या टीआरपीसाठी अशा खोट्या बातम्या दाखवत आहेत. कोणताही आधार नसलेल्य तथ्यहीन बातम्या दाखवलेल्या प्रसारमाध्यमांवर आपण कायदेशीर कारवाई करणार आहे. मी ठाकरे गटातच आहे. मी उमेदवारी मागितली होती. पक्षाने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली आहे. खैरे साहेब आणि माझ्यात कोणताही वाद नाही. मी चंद्रकांत खैरे साहेबांचा प्रचार करणार आहे, असंही अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण; म्हणाले...