Akhilesh Yadav and I.N.D.I.A Alliance Rajya Sabha : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. 15 खासदार असलेला पक्ष इंडिया आघाडीत आणत भाजपला मोठा झटका देण्याची तयारी अखिलेश यांनी केली आहे. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर काही अपक्ष खासदार इंडिया आघाडीसोबत आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे इंडिया आघाडीची ताकद हळूहळू वाढताना पाहायला मिळाली. सध्या अखिलेश यादव यांच्या मदतीने 15 खासदार असलेला पक्ष इंडिया आघाडीसोबत येण्याची शक्यता आहे. 


जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाविरोधात हिंसकरुप धारण केल्याचा आरोप


आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी (दि.24) राजधानी दिल्लीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राज्यात सत्ता मिळवल्यानंतर आणि केंद्रातील सत्तेत सहभागी झाल्यानंतर तेलगू देसम पक्षाने जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाविरोधात हिंसकरुप धारण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या आंदोलनाला इंडिया आघाडीची साथ मिळाली आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या आंदोलनात अखिलेश यादवही सहभागी झाले. त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस इंडिया आघाडीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहे. 


जगनमोहन रेड्डी यांचे राज्यसभेत 11 खासदार 


वायएसआर काँग्रेस इंडिया आघाडीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सत्तेत उतरल्या तर विरोधी पक्षांची ताकद मोठी असणार आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसचे लोकसभेत केवळ चार खासदार आहेत. मात्र, राज्यसभेत जगनमोहन रेड्डी यांची मोठी ताकद आहे. राज्यसभेत त्यांचे 11 खासदार आहेत. राज्यसभेतील हा आकडा अतिशय मोठा आकडा असल्याची माहिती आहे. 


NDA ला बहुमताच्या आकड्यापासून 13 जागा कमी


राज्यसभेत एकूण 245 जागा आहेत, परंतु 19 जागा रिक्त असल्याने संसदेच्या उच्च सभागृहाचे एकूण संख्याबळ सध्या 226 आहे. अशा स्थितीत राज्यसभेतील संदस्यांचा आकडा 113 होतो. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सध्या राज्यसभेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDA ला बहुमताच्या आकड्यापासून 13 जागा कमी आहेत. राज्यसभेत भाजपच्या 86 जागा असून एनडीएचे एकूण 101 खासदार आहेत.






इतर महत्वाच्या बातम्या 


Girish Mahajan on Anil Deshmukh : अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, भाजप संकटमोचक संतापले; म्हणाले...