Ajit Pawar on Vijay Shivtare, Pune : "विजयराव एखाद्याच्या मागे लागले की, सळो की पळो करुन सोडतात. मग मागचा पुढचा विचार करत नाहीत. मी विजयरावाचं शत्रूत्वही पाहिलय. मी,एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण बसलो होतो. त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात हात दिला. मला म्हटले अजित पवार मैत्री काय असते ते विजय शिवतारे तुम्हाला दाखवून देईल. त्यांनी वर्षा बंगल्यावर स्पष्ट सांगितलं. दोन तास आम्ही बसलो होतो. मला स्पष्ट सांगितलं की, बारामती मतदारसंघातील भोर, पुरंदर हवेली, मुळशी, बारमती, दौंड आणि इंदापूर या भागातील प्रश्न सुटले पाहिजेत. याबाबत निवेदन दिलं. मला काही नको, माझ्या भागातील प्रश्न सुटले पाहिजेत.", असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.  महायुतीचा शेतकरी जनसंवाद मेळावा पुण्याच्या सासवड येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. 


विजय शिवतारेंमध्ये क्षणात बदल झाला


अजित पवार म्हणाले, शिवतारेंनी भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मनात विचार येऊ लागले की, मी राज्याचा प्रमुख झालोय. भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांनी पाठिंबा दिलाय. त्यामुळे महायुतीचं सरकार आलंय.  जीवाभावाच्या सहकाऱ्यांसाठी मी मुख्यमंत्री झालोय. सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी करतोय. त्यावेळेस माझ्याचं जीवाभावाचे सहकारी जर अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढे चालले तर मला तरी मुख्यमंत्रिपद कशाला हवंय? मी कोणासाठी हे करणार आहे. त्यातील एक गोष्ट विजय शिवतारेंच्या कानावर गेली. त्यानंतर विजय शिवतारेंमध्ये क्षणात बदल झाला, असंही अजित पवार यांनी सांगितलं. 


विरोधचं केला तर आपल्याला निधी कसा मिळणार?


पुढे बोलताना अजित पवार म्हणाले,  अजित पवार म्हणाले, भारत देश प्रगती करत असताना समोरच्या खासदारांनी विरोधचं केला तर आपल्याला निधी कसा मिळणार? भाषणं देऊन लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. विजय शिवतारेंनी एक भूमिका घेतली होती. त्यांनी अॅग्रेसिव्हपणे त्यांची भूमिका मांडली. पत्रकारांनी देखील त्यांची भूमिका जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी घडतं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्वस्थ होत होते.




इतर महत्वाच्या बातम्या 


Madha :  सरपंचपदापासून राजकारणाला सुरूवात, अकलुजच्या तालमीतला पठ्ठ्या माढ्याच्या मैदानात, कोण आहेत धैर्यशील मोहिते पाटील?