Ajit Pawar on Sharad Pawar : आता चार दिवस सूनेचे आलेत, बायकोला मत द्या, भाषणं करुन पोट भरणार नाही, अजितदादांचा दौंडमध्ये हल्लाबोल

Ajit Pawar, दौंड : "विचार करु नका, भावनिक होऊ नका. आम्ही साहेबांच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काही द्यायचे होते ते भरभरून दिले. त्यामध्ये तुम्ही पण कमी पडला नाहीत, मी पण कमी पडलो नाही.

Continues below advertisement

Ajit Pawar, दौंड : "विचार करु नका, भावनिक होऊ नका. आम्ही साहेबांच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काही द्यायचे होते ते भरभरून दिले. त्यामध्ये तुम्ही पण कमी पडला नाहीत, मी पण कमी पडलो नाही. चार दिवस सासूचे म्हटलं जातं. आता चार दिवस सूनेचे आलेले आहेत. आमची कांचन पण बाहेरची नाही. काहीजण बाहेरचे बाहेरचे 40 वर्ष झाली तर बाहेरचे म्हणतात. तुमच्या घरातल्या सुनेला तुम्ही तरी बाहेरचे म्हणाल का? तुम्हाला पटतय का बघा. निवडणुकीचं बोला , विकासाचं बोला. घरातली व्यक्ती वयस्कर झाल्यानंतर मुलाच्या हातात धंदा देते, तसंच द्याना आता आमच्या हातात", असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारार्थ दौंडमध्ये सभा पार पडली. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. 

Continues below advertisement

राजकारणात कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्र नसतो

अजित पवार म्हणाले, कोणीही राजकारणात कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्र नसतो. कधी कोणी मनात आणलं होतं का की, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येतील. काहीजण म्हणतात अजित पवारांनी या वयात शरद पवारांना सोडायला नको होतं. 1987 पासून साहेबांना दैवत मानत आलो. ते म्हणतील ते काम केलं. ते म्हणतील तो उमेदवार, ते म्हणतील पूर्वदिशा त्याचे फक्त आपण समर्थन करायचं. ज्यावेळी आपण ज्यांना नेता मानतो, त्यांची प्रत्येकवेळी भूमिका ऐकली. परंतु मी पण आता साठीच्या पुढे गेलो. मोदींकडे आपण विकास पुरुष म्हणून पाहतो. राष्ट्रवादीची वैचारीक भूमिका बाजूला ठेऊन आपण मोदींसोबत काम करुयात म्हटलं. अनेकांनी त्यापद्धतीने काम केलं आहे. एवढ्या देशाला पुढे न्यायचे असेल तर नेता भक्कम लागतो, असंही अजित पवारांनी सांगितलं. 

 गेल्या 10 वर्षांपासून एकही सुट्टी न घेता ते काम करतात

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले,   देशाने मोदींना पूर्ण पाठिंबा दिला. गेल्या 10 वर्षांपासून एकही सुट्टी न घेता ते काम करतात. ते वेड्या घबाळ्याचे काम नाही. आम्ही लोक तुमच्यातील आहोत. आपण संस्था चांगल्या चालवणारे लोक आहेत. तेच म्हटले की आम्ही राजीनामा देतो. मी आज राज्य चालवू शकतो. माझी प्रशासनावर पकड आहे. आम्हाला देशाचा निधी आपल्या लोकसभा मतदारसंघात आणायचा आहे. बारामतीमध्ये केला तसाच दौंडचा विकास करतो. स्वत:च्या घरचा बघत नाही. 

राहुल काम करतो म्हणून तिकडंची माणसं चलबिचल आहेत

मागे पण पूर्व भागात खूप रस्ते केले. आज सुसाट ट्रॅक्टर वर चढतो. राहुल काम करतो म्हणून तिकडंची माणसं चलबिचल आहेत. राहुलला क्रेडिट जाईल की काय? आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे काम केलं. लोक आपल्या पाठिशी उभे राहतात. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, हीच आमची इच्छा आहे, असंही अजित पवार यांनी नमूद केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

बीड लोकसभेत नवा ट्विस्ट, जरांगेंचा खास माणूस निवडणुकीच्या रिंगणात; शेवटच्या दिवशी भरला अर्ज

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola