Brigitte Macron Slap Emmanuel Macron : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन (Brigitte Macron) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ब्रिजिट मॅक्रॉन यांनी त्यांचे पती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या तोंडावर जवळजवळ चापट मारल्याचं दिसत आहे. हे दृश्य पाहताच बाजूला असलेली महिला कर्मचारीही अवाक झाल्याचं दिसून आलं. सुरुवातीला हा व्हिडीओ डीपफेक असल्याचं बोललं जात होतं. पण नंतर हा खरा असल्याचं फ्रेंच राष्ट्रपती कार्यालयाने स्पष्ट केलं. हा व्हिडीओ 25 मे रोजीच्या व्हिएतनाम दौऱ्यावेळी हनोई विमानतळावरचा असल्याचं सांगितलं जातंय.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ब्रिजिट मॅक्रॉन यांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची हनुवटी पकडली आणि नंतर त्यांना जोरदार धक्का दिला. ही घटना विमानातून उतरताना घडली. त्यामुळे आपण कोणत्या ठिकाणी आहोत याचं भान असलेल्या मॅक्रॉन यांनी लगेच बाहेर असलेल्या लोकांना हात दाखवला. मात्र यावेळी त्यांच्या बाजूला असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने हा प्रकार बघितला. ती कर्मचारीही अवाक झाल्याचं दिसून आलं.
Brigitte Macron Viral Video : हा व्हिडीओ खरा असल्याचं मान्य
सुरुवातीला फ्रेंच राष्ट्रपती कार्यालयाने हा व्हिडीओ खोटा असल्याचे सांगितले. परंतु नंतर तो खरा असल्याचे मान्य केले. मॅक्रॉन यांनी या घटनेचं सहज घडलेली घटना असं वर्णन केले आणि सोशल मीडियावरील अतिरंजित प्रतिक्रियांवर टीका केली. आम्ही एकमेकांशी हसत खेळत होतो असं इम्यॅन्यूएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या कार्यालयानेही या व्हिडीओसाठी 'प्रायव्हेट आणि खोडकर' असा शब्द वापरला आहे.
Brigitte Macron Emmanuel Macron Video : व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा आणि त्यांच्या पत्नीच्या या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यावर अनेक कमेंट्स आल्या आहेत. काहींनी हा एक एक मजेदार क्षण मानला. तर काहींनी तो अतिरंजित आणि खोटा म्हणून नाकारला. काही यूजर्सनी या घटनेवरून 'डीपफेक' व्हिडीओ असल्याचं सांगत त्यावर चिंता व्यक्त केली आहे.
Brigitte Macron Slap Viral Video : इमॅन्युएल मॅक्रॉन यांची पत्नी 24 वर्षांनी मोठी
मॅक्रॉन आणि ब्रिजिट यांचे वैवाहिक जीवन नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. ब्रिजिट मॅक्रॉन या इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यापेक्षा 24 वर्षांनी मोठ्या आहेत. इमॅन्युएल मॅक्रॉन ज्या शाळेमध्ये शिकत होत्या त्या शाळेमध्ये ब्रिजिट मॅक्रॉन या शिक्षिका होत्या. या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर 2006 साली ब्रिजिट यांनी त्यांच्या पतीसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर हे दोघे 2007 मध्ये विवाहबद्ध झाले. त्यानंतर त्यांच्या नात्याविषयी अनेकदा चर्चा झाल्या.
ही बातमी वाचा: