मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करून राष्ट्रवादी अजित पवार गटाने (Ajit Pawar) त्यांच्या पक्षाची पहिले निवेदन प्रसिद्ध केली आहे. 'राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद हा न्यायप्रविष्ठ असून अंतिम निकालाच्या अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे' असं या निवेदनात म्हटलं आहे. 


सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणीवेळी एक महत्त्वाची टिप्पणी केली होती. त्यामध्ये अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह विधानसभा निवडणुकांमध्ये वापरता येईल, मात्र घड्याळ हे चिन्हाची जाहिरात देताना सदर विषय न्यायप्रविष्ट आहे अशा प्रकारची माहिती देणारे निवेदन राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील दैनिकातून प्रसिद्ध करावे असे आदेश दिले होते. 


अजित पवार गटाचे निवेदन प्रसिद्ध


आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दैनिक लोकसत्तामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन छापून आले आहे. त्यामध्ये 'निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह दिले असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. अंतिम निकालाच्या अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे' असं नमूद करण्यात आलं आहे.


शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव


निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर त्यावर आक्षेप घेत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अजित पवारांना दिलेले चिन्ह गोठवावे अशी मागणी शरद पवार गटाने केली. अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह दिल्यास ग्रामीण भागातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुर्तास अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह देऊ नये अशी मागणी करण्यात आली होती.


शरद पवार गटाची ही मागणी न्यायालयाने फेटाळली. परंतु या खटल्यामध्ये अंतिम निकालानुसार बदल होऊ शकतो, त्यामुळे भविष्यात अजित पवार गटाकडेच घड्याळ हे चिन्ह राहू शकेल याची शाश्वती नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. 


घड्याळ चिन्हाबाबत संभ्रम टाळण्यासाठी निवेदन द्या


घड्याळ या चिन्हाबाबत लोकांमधील संभ्रम टाळण्यासाठी अजित पवार गटाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये निवेदन प्रसिद्ध करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली. 'हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून अंतिम निकालाच्या अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे' असं त्यात नमूद करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. 


ही बातमी वाचा: