Nitin Gadkari, Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने नागपूरमधून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन गडकरींनी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नितीन गडकरी यांनी केलेले आवाहन चर्चेचा विषय ठरले आहे. यावेळेस प्रत्येक बुथवर 75 टक्के मतदान व्हायला हवे. जेवण द्या पण दारू नको, अशा सूचना नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 

काँग्रेसकडून नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे मैदानात 

काँग्रेस पक्षाने नितीन गडकरी यांच्याविरोधात विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना लोकसभेसाठी मैदानात उतरवण्यासाठी काँग्रेसने तयारी केले होती. मात्र, काँग्रस नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विदर्भातील 4 लोकसभा मतदासंघात काँग्रसने नवखे उमेदवार दिले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले मैदानात उतरले होते. मात्र, नाना पटोले यांचा दारुण पराभव झाला होता. नितीन गडकरी यांनी नाना पटोलेंना 2 लाख 84 हजार मतांनी पराभूत केले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर, गडकरींविरोधात विकास ठाकरे, भंडारा-गोंदियातून प्रशांत पडोळे रिंगणात