Ajit Pawar NCP and Sharad Pawar NCP, बिहार :  विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिलाय. माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी आज अजितदादांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) सोडचिठ्ठी दिलेली असताना बिहारमध्ये आणखी एका नेत्याने पक्षाला रामराम ठोकलाय. राहत कादरी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये (Sharad Pawar NCP) प्रवेश केलाय. 


बिहारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भगदाड 


अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिहारमध्ये भगदाड पडलंय. बिहार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राहत कादरी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. एकीकडे अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार निवडून आल्याने राष्ट्रीय राजकारणात पक्ष वाढीस लागला होता. मात्र, आता शरद पवारांनी कादरी यांना आपल्याकडे खेचत अजित पवारांना हादरा दिलाय. 


बाबाजानी दुर्रानी यांचाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश 


बाबाजानी दुर्रानी यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांच्या उपस्थितीत दुर्रानी यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी घनसावंगीचे आमदार राजेश टोपेही उपस्थित होते. पक्षप्रवेश केल्यानंतर दुर्रानी म्हणाले, बाबाजानी दुर्रानी म्हणाले, 10 वर्षात देशात जातीवाद पसरवला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे आज मुस्लिम समाज मोठ्या अपेक्षने पाहात आहे. जोपर्यंत देशात परिवर्तन होत नाही, तोपर्यंत आपणास दीर्घायुष्य मिळावे. मला देखील खंत वाटते मी साहेबांना का सोडले? लोकसभा निवडणूक लोकांनी भाजपविरोधात हातात घेतली होती. शरद पवारांच्या (Sharad Pawar) नेतृत्वाखाली राज्यात सत्तापरिवर्तन होणार आहे. आम्ही कुठेही असलो तरीही आतून शरद पवार यांच्यासोबत होतो आणि त्यांना मदत देखील केली. मुस्लिम समजाचे उलमा यांचा दबाव होता की शरद पवार गटासोबत राहायला पाहिजे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Jitesh Antapurkar : आमदार जितेश अंतापूरकर कॅमेरे बघून पळाले, धापा टाकत गाडीत जाऊन बसले, क्रॉस वोटिंगवर काय काय म्हणाले?