Jitesh Antapurkar : काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप करण्यात येत होता. शिवाय, भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर जितेश अंतापूरकर भाजपसोबत जाणार का? असा सवालही उपस्थित होत होता. दरम्यान आज नांदेडमध्ये (Nanded) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जितेश अंतापुरकर (Jitesh Antapurkar)  आले होते. यावेळी प्रश्न विचारण्यासाठी माध्यम प्रतिनिधी पोहोचले असता जितेश अंतापूरकर यांनी पळ काढल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, माध्यम प्रतिनिधींनी पाठलाग करत त्यांची प्रतिक्रिया मिळवली.


जितेश अंतापूरकर काय काय म्हणाले ? 


जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माध्यम प्रतिनिधींनी जितेश अंतापुरकर यांना प्रतिक्रिया घेण्यासाठी  थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पाहून जीतेश अंतापुरकर त्यांनी पळ काढला त्यांचा पाठलाग करत, माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गाठलं. माझ्यावरती झालेल्या आरोपांबाबत मी सविस्तर बोलणार असल्याचे हितेश अंतापुरकर यावेळी म्हणाले. क्रॉस  वोटिंगच्या आरोपाबाबत आपण पुराव्यानिशी बोलू असंही अंतापुरकर यांनी सांगितलं. अशोक चव्हाण यांची भेट ही विकास कामांबाबत घेतली होती. माझे आणि चव्हाण साहेबांचे कौटुंबिक संबंध आहेत . ते जिल्ह्याचे नेते आहेत . त्यामुळे भेट घेऊन त्यांच्यासोबत विकास कामांवर चर्चा केली असं जितेश अंतापुरकर म्हणाले. आपण काँग्रेसमध्ये आहात का असं विचारलं असता निश्चित मी काँग्रेसमध्येच आहे, असं उत्तर जितेश अंतापुरकर यांनी दिले. 


हायकमांड क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाई करणार 


विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर याबाबत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठकही झाली होती. या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले होते. ज्या आमदारांनी पक्षाचा आदेश डावलला त्या आमदारांच्या नावात आमदार जितेश अंतापूरकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. पक्षाने कारवाईचे संकेत दिल्यानंतर त्यांनी  नुकतेच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. अंतापुरकर यांच्या शिवाय  कैलास गोरंट्याल यांच्यावरही क्रॉस वोटिंगचा आरोप करण्यात आला होता. मात्र, कैलास गोरंट्याल पक्षनिष्ठ असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. 





इतर महत्वाच्या बातम्या 


Ajit Pawar: लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रावर कर्ज? अर्थ खात्याच्या आक्षेपावर आता अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं...