एक्स्प्लोर

Maval Loksabha: अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकारी मला भेटतात; संजोग वाघेरेंच्या वक्तव्यामुळे ट्विस्ट वाढला

Maharashtra Politics: मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजोग वाघेरे आणि शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांच्यात मुख्य लढत आहे. अजित पवारांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संजोग वाघेरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा.

पिंपरी: सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या प्रचारात महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये राजकीय द्वंद्व रंगले आहे. मात्र, मावळ लोकसभा मतदारसंघात (Maval Loksabha) सध्या एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहेत. संजोग वाघेरे (Sanjog Waghere) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजोग वाघेरे यांनी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनेक महत्त्वाची पदं भुषविली होती. परंतु, आता ते ठाकरे गटाचे उमेदवार असल्याने महायुती आणि पर्यायाने अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा विरोधक आहे. मात्र, संजोग वाघेरे यांची जुन्या पक्षाशी असलेली नाळ अद्याप तुटलेली नाही. मावळ लोकसभेच्या निवडणुकीत संजोग वाघेरे यांना या गोष्टीचा फायदा होण्याची शक्यता आहे. संजोग वाघेरे यांनी स्वत: अजितदादांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजूनही आपल्या संपर्कात असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे मावळ लोकसभेच्या लढाईत ट्विस्ट आला आहे.

संजोग वाघेरे यांनी बुधवारी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. अजित पवार यांनी मावळ लोकसभेतील मविआचे उमेदवार संजोग वाघरेंना भेटू नका, अशी तंबी कार्यकर्त्यांना दिली आहे. मात्र, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते संजोग वाघेरे यांना भेटत आहेत. 

अजित पवारांची राष्ट्रवादी मविआचा प्रचार करते? मविआ उमेदवाराच्या उत्तराने संभ्रम वाढला.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील हेच मित्र आणि नातेवाईक तुमचा प्रचार करतायेत का? असा प्रश्न विचारला असता वाघरेंनी संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले  आहे.  अजित पवार गटातील मित्र आणि नातेवाईक प्रत्येकाच्या भेटीगाठी होतच असतात. जिथे जाईल तिकडे अनेकजण भेटत असतात, असे वाघेरे यांनी म्हटले. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी मावळ लोकसभेत महायुतीचा प्रचार करणार की महाविकासआघाडीचा असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. संजोग वाघेरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, अजित पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मला भेटत असले तरी ते कोणाचे काम करतील, हा त्यांचा प्रश्न आहे, अशी कोड्यात टाकणारी भूमिका वाघेरे यांनी घेतली. 

23 तारखेला माझा उमेदवारी अर्ज भरायला मविआतील सगळे नेते येतील: संजोग वाघेरे

संजोग वाघेरे मावळ लोकसभेत फक्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनाच घेऊन प्रचार करत असल्याचे चित्र आहे. शरद पवार गटाकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे. याविषयी विचारले असता वाघेरे यांनी म्हटले की, सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरु असल्याने शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिरुर आणि बारामतीमध्ये आहेत. यापूर्वी आम्ही अनेक बैठका एकत्र घेतल्या आणि फिरलो. आता 23 एप्रिलला मी उमेदवारी अर्ज भरताना मविआचे प्रमुख नेते उपस्थित राहतील, असा दावा संजोग वाघेरे यांनी केला.

आणखी वाचा

सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? अजित पवार गटातील आमदारांच्या वक्तव्यानं खळबळ

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Sanjay Raut on Abhijeet Dipke: अभिजीत दिपके हळूहळू परिपक्व होतील, संघर्षात हे सहन करावेच लागते; संजय राऊतांचा प्रेमाचा सल्ला
अभिजीत दिपके हळूहळू परिपक्व होतील, संघर्षात हे सहन करावेच लागते; संजय राऊतांचा प्रेमाचा सल्ला

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget