Ravi Kishan : काही दिवसांपूर्वी अपर्णा ठाकूर नावाच्या महिलेने भाजप (BJP) खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांच्यावर काही गंभीर आरोप केले. तसेच ती त्यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा देखील या महिलेने केला आहे. त्याचसोबत अभिनेत्री शिनोवा ही त्यांची मुलगी असल्याचा देखील दावा यावेळी या महिलेने केला आहे. त्यानंतर रवी किशन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. आता शिनोवाने कोर्टात देखील रवी किशन यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.
शिनोवाने कथितरित्या मुंबईच्या कोर्टात दिवाणी खटला दाखल केला आहे. त्याचबरोबर तिने यामध्ये DNA चाचणी करण्याची देखील मागणी केली आहे. त्याचप्रमाणे तिने कोर्टात याचिका दाखल करत तिला अधिकृतरित्या रवी किशन यांच्या मुलगी म्हणून स्वीकारण्यात यावं अशी देखील मागणी केली आहे. अपर्णा ठाकूर आणि शिनोवाने काही दिवसांपूर्वी रवी किशन यांना कोर्टात खेचण्याची देखील भाषा केली होती. त्यानंतर आता शिनोवाने कोर्टात याचिका दाखल केली आहे.
शिनोवाने याचिकेत कोणत्या मागण्या केल्यात?
शिनोवाने या याचिकेत ती रवी किशन यांची बायोलॉजिकल मुलगी असल्याचं घोषित करण्यात यावं अशी मागणी केली आहे. तिला आपली मुलगी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला नाही याची खात्री करण्यासाठी, न्यायालयाने देखील एक आदेश (आदेश) जारी केला पाहिजे.याशिवाय, त्यांनी अपर्णा सोनी उर्फ अपर्णा ठाकूर आणि इतरांविरुद्ध यूपीमध्ये दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्याचप्रमाणे शिनोवाने DNA चाचणी करण्याची देखील मागणी यामध्ये केली आहे.
रवी किशन यांच्या पत्नीने दाखल केली तक्रार
रवी किशनची पत्नी प्रीती शुक्ला यांनी चार दिवसांपूर्वी लखनौमधील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर IPC कलम 120B (गुन्हेगारी कट), 195 (खोटे पुरावे देणे किंवा बनवणे), 386 (खंडणी) आणि 504 (हेतूपूर्वक अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर्णा ठाकूर यांनी केलेले सर्व दावे बिनबुडाचे आहेत आणि ती केवळ पैसे उकळण्याचा आणि त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रीतीने कायदेशीर कारवाई केली.
ही बातमी वाचा :