Shivadi, Ajay Choudhari's brother join Shinde Group : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना, शिवडीमध्ये ठाकरे गटाला जोरदार झटका बसला आहे. ठाकरे गटाचे स्थानिक आमदार आणि विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी यांचे बंधू संजय विनायक चौधरी, शाखा संघटक अनुराधा इनामदार तसेच शिवसैनिक श्रीकांत साळुंखे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन उपनेते विभागप्रमुख यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यशवंत जाधव यांनी भगवा ध्वज देऊन सर्वांचे स्वागत केले. 


यशवंत जाधव यांनी सूत्रे हलविल्याची जोरदार चर्चा


दक्षिण मुंबईत वरळी आणि शिवडी अशा दोनच ठिकाणी ठाकरे गटाचे आमदार आहेत. मात्र शिवडीच्या आमदाराच्या भावानेच शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रवेशासाठी विभागप्रमुख यशवंत जाधव यांनी सूत्रे हलविल्याची जोरदार चर्चा आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवडी परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचे संघटन आणखी भक्कम झाल्याचे मानले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईत शिवसेना आणि महायुतीच्या विजयासाठी झटून कामाला लागा,अशा सूचना यशवंत जाधव यांनी सर्वांना केली आहे.






दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी 


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबई या बालेकिल्ला असलेल्या लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंनी निष्ठावान शिवसैनिक अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, आता अरविंद सावंत यांच्यासमोर पूर्वीपेक्षा मोठी आव्हाने असणार आहेत. शिंदेंची शिवसेना, भाजप आणि मनसे असे तिन्ही पक्ष अरविंद सावंत यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहेत. दरम्यान अशाच वेळी दक्षिण मुंबई मतदारसंघातील ठाकरे गटाच्या आमदाराचे बंधू शिंदेंना जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या 


मुंबईत भाजपचा भयानक प्लॅन, झोपडपट्ट्यांमधील लोकांना मिठागराच्या जमिनीवर नेऊन टाकणार; पीयूष गोयलांच्या वक्तव्यावरुन आदित्य ठाकरेंचा आरोप