Aaditya Thackeray on Piyush Goyal : भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पियुष गोयल यांच्या वक्तव्यांचा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. झोपडपट्टी हटवून मिठागरातील जागेवर न्यायची, अस वक्तव्य पियुष गोयल यांनी केलं होतं. गोयल यांच्या विधानावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. "मिठागर दाखवून विकासात मिठाचा खडा टाकत आहेत. गोयल साहेब तुम्ही उमेदवार आहात तुमच्या मनात जे आहे ते दिसतंय", असं आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मिठागर दाखवून विकासात मिठाचा खडा टाकत आहेत
आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईतील सगळ्या झोपडपट्ट्या काढून टाकायच्या, खोटं बोलायचं. झोपडपट्टीत राहतात त्यांना सगळ्या स्लम मिठागार नेऊन टाकायचं. पियुष गोयल म्हणतात, झोपडपट्टी हटवून मिठागरातील जागेवर न्यायचे आणि घरं देणार म्हणायचे. मुंबईत स्लम फ्री करणार पण हे अनेक दिवस फक्त बोलत राहिले. केलं काहीच नाही. त्यामुळे या जागा हडप करायचा प्लॅन आहे. मिठागर दाखवून विकासात मिठाचा खडा टाकत आहेत. गोयल साहेब तुम्ही उमेदवार आहात तुमच्या मनात जे आहे ते दिसतंय. तुम्ही 2022 पर्यंत घरं देणार म्हणलात, पण दिले नाहीत, असंही आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) स्पष्ट केलं.
मुंबईला ओरबडण्याच काम सुरु आहे
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, घरं देणार होतात त्याच काय झालं? मुंबईला ओरबडण्याच काम सुरु आहे. उत्तर मुंबईत स्कीम सांगितली झोपडपट्टी हटवून बिल्डरांना मालामाल करायचं आहे. हे झोपडपट्टी हातावणार नाहीत,तर गरीब हटवणार आहेत. विकास नक्की होईल पण गरीब बेघर होणार आहेत. हेच मंत्री होते. आम्ही कोविड मध्ये सांगितलं ट्रेन सुरु करा. पण यांनी केलं नाही आणि अनेक मजदूर चालत गेले आणि त्रास झाला. हीच यांची नीती आहे गरिबाला त्रास देण्याची, अशी टीकाही गोयल यांनी केली.
आम्ही सगळे महाराष्ट्रासाठी लढतोय
धारावी मध्ये देखील मिठागर जागेवर त्यांना हळवलं जाईल. यांच्या हृदयातलं बोलणं समोर आलय. भाजप नेते हे विधान मागे घेतील पण त्यांचं खरं रुप बाहेर आलय. पक्ष त्यांचा सोबत आहे. आम्ही सगळे महाराष्ट्रासाठी लढतोय. इथला मजूर यांना दुसरीकडे न्यायचे आहेत. मुंबई मुंबईकर चालवतील दिल्ली वाले नाही. हा मुद्दा देशाचा आहे. निवडणुकीत केंद्रात परिवर्तन होणार आहे. परिवर्तन होणार नसतं इतके पक्ष फोडले नसते. राम नाईक यांनी म्हटलंय दाऊदची मदत घेतली होती त्यांनाच पक्षात आता घेतलं.