Uddhav Thackeray and Aaditya Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) दिल्लीत दाखल झाले आहेत. इंडिया आघाडी रामलीला मैदानावर रविवारी (दि.30) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत निषेध प्रदर्शन करणार आहे. उद्याच्या इंडीया आघाडीच्या रामलीला मैदानावरील निषेध प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ठाकरे पिता - पुत्र दिल्लीत पोहोचले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी इंडिया आघाडी सज्ज झाली आहे. दिल्लीतील निषेध प्रदर्शनासाठी शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. 






तृणमूल काँग्रेसचाही सहभाग 


इंडिया आघाडीच्या विरोध प्रदर्शनात तृणमूल काँग्रेसकडून प्रतिनिधी पाठवण्यात येणार आहेत. तृणमूल काँग्रेसकडून दोन नेते या इंडिया आघाडीच्या रॅलीसाठी उपस्थित राहणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आली. शिवाय विरोधी पक्षांची बँक खातीही गोठावण्यात आली, या सर्वांविरोधात इंडिया आघाडीने एकजूट दाखवली आहे. केजरवाल आणि सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीकडून महार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 






इंडिया आघाडीच्या रॅलीला कोण कोण उपस्थित राहणार ? 


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीने एकजूट दाखवली आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचे अनेक नेते एकत्र येणार आहेत.  नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव,  झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, आरजेडी नेते तेजस्वी यादव, सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा,, द्रमुकचे तिरुची शिवा, टीएमसीचे डेरेक ओब्रायन आणि इतर नेते या रॅलीला उपस्थित राहू शकतात.






इतर महत्वाच्या बातम्या 


Baramati Loksabha: अजित पवारांचा पेशन्स गेम! विजय शिवतारे-शरद पवारांनी पत्ते उघड केल्यानंतरच सुनेत्रा पवारांचं नाव जाहीर केलं