Tamil Nadu Assembly Elections: पहिल्यांदा बिहार विधानसभा निवडणुका आणि आता गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणार्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोठी घोषणा केली आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे की आमचा पक्ष आता तामिळनाडूमध्ये होणार्या विधानसभा निवडणुका लढवेल. सोबतचं पक्षाचे कार्यकर्तेही उत्तर प्रदेशची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढच्या वर्षी यूपीमध्ये विधानसभा निवडणुका आहेत.
यूपीमध्येही कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत - ओवैसी
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, आम्ही तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका लढणार आहे, गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवले आहे. मी आज राजस्थानमध्ये पक्षाच्या सदस्यांसमवेत समीक्षा व चर्चा करण्यासाठी जात आहे. "ते म्हणाले," आमचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशातही परिश्रम घेत आहेत."
योग्य वेळी बंगालमधील पक्षाची रणनिती सांगेल ओवैसी
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे काल झालेल्या रॅलीत फुरफुरा शरीफ दर्गा येथील पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी डावे आणि काँग्रेस यांच्यासमवेत मंचावर पाहायला मिळाले. यावर ओवेसी म्हणाले, "मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया". योग्यवेळी आम्ही आमची पश्चिम बंगालमध्ये रणनितीबद्दल बोलू. ''
गुजरात-बिहारमध्ये ओवैसींना विजय
गुजरातमध्ये प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणाऱ्या असदुद्दीन ओवैसीच्या एआयएमआयएमने अहमदाबादच्या मुस्लिम बहुल जमालपूर आणि मक्तमपुरा प्रभागातील सात जागा जिंकल्या. यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमने पाच जागा जिंकल्या होत्या.
तामिळनाडू-बंगालमध्ये निवडणुका कधी आहेत?
तामिळनाडू विधानसभेची मुदत 31 मे 2021 रोजी संपत आहे तर बंगाल विधानसभेची मुदत 30 मे 2021 रोजी संपुष्टात येत आहे. तामिळनाडूमधील 234 विधानसभा जागांसाठी 6 एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर बंगालच्या 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांचे निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहेत.