Devendra Fadnavis Targeted shiv Sena: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली. यानंतरपासूनच महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. एमआयएमच्या ऑफरनंतर भाजपचे अनेक नेते सातत्याने शिवसेनेला लक्ष करत आहेत. यावरच बोलताना आज शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीला एमआयएमचा आघाडीचा प्रस्ताव हे भाजपचं षडयंत्र आहे. उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्याचा धागा धरत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ठाकरे यांना टोला लगावत ते म्हणेल आहेत की, एमआयएम सोबत युती करायचा विचार करणाऱ्या महाविकास आघाडीची ही मिलिजुली कुस्ती आहे. ते सगळे मिळून खेळतायेत.


देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''अजाण स्पर्धा भरवणार ते, जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिणार ते, त्यांचेच घटक पक्ष एमआयएम सोबत युती करायचा विचार करणार तेच आणि आरोप ही करणार तेच. ही मिलिजुली कुस्ती आहे. ते सगळे मिळून खेळतायेत.''


काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना पक्षातील खासदारांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना खासदारांना शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचावा. एमआयएमचा कट उधळून लावा, असे आदेश दिले आहेत. भाजपवर हल्लाबोल करत ते म्हणाले आहेत की, ''मेहबुबा मुफ्ती विसरू नका. एक वेळ अशी होती की ते मुफ्तीसोबत संसार करत होते. आता ते आपल्याला बोलत आहेत.'' ते म्हणाले, ''आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत. महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही त्यांच्यासोबत (एमआयएम) जाणार नाही. महाविकास आघाडीला एमआयएमचा आघाडीचा प्रस्ताव हे भाजपचं षडयंत्र आहे.''  


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Shivsena : शिवसेनेच्या बदनामीसाठी भाजपकडून एमआयएमला सुपारी; राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल


CM Uddhav Thackeray : हिंदुत्व महाराष्ट्राभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा, उद्धव ठाकरेंचे खासदारांना आदेश


एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये अनेक वर्ष राहून मनोरंजनच केलं; दानवेंची खरमरीत टीका