(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये अनेक वर्ष राहून मनोरंजनच केलं; दानवेंची खरमरीत टीका
Raosaheb Danve: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले होते.
Raosaheb Danve: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. यावरच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दानवे यांना लक्ष करत हे केवळ मनोरंजन असून दानवे स्वप्न पाहत असल्याचे ते म्हणाले होते. आता यावरच दानवे यांनी खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे. दानवे म्हणाले आहेत की, ''एकनाथराव खडसे यांनी भाजपमध्ये अनेक वर्ष राहून मनोरंजनच केले आहे. एकनाथ खडसे यांच्या कल्पनेत असतील काही मनोरंजन करणारे नेते. पण भाजपचे नेते हे कामे करणारे आहेत. मनोरंजन करणारे नाहीत.'' रावसाहेब दानवे यांची गिरीष महाजन यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास हजेरी लावली. यानंतर माध्यमांशी बोलताना ते असे म्हणाले आहेत.
चार प्रेन ड्राईव्ह बॉम्ब बाहेर येणार : दानवे
यावेळी महाविकास आघाडी सरकारला इशारा देत ते म्हणाले आहेत की, आणखी चार प्रेन ड्राईव्ह बॉम्ब बाहेर येणार आहेत. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हान यांची फॉरणसिक चाचणी करण्यात यावी. तसेच त्यांना कठोर शासन करणयात यावे. काहीतरी सत्य दडलय म्हणूनच तर त्यांनी राजीनामा दिला, असं देखील ते म्हणाले आहेत.
त्याच दिवशी त्यांचे हिंदुत्व फिके पडले : दानवे
शिवसेनेवर निशाणा साधत दानवे म्हणाले आहेत की, ''जनसंघापासून आजवर कधीही हिंदुत्व विरोधी काम केले नाही. नमाज अदा करण्याचे प्रशिक्षण दिले नाही. भाजपच्या हिंदुत्ववावर कोणीही शंका घेण्याचे कारण नाही.'' ते म्हणाले, दाऊद इब्राहिमशी सबंध ठेवणारा नवाब मलिक जेलमध्ये असताना सुद्धा स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे त्याला हात लावू शकले नाही. कारण त्यांना हिरव्याची भीती वाटते. ज्या दिवशी त्यांनी आमच्याशी दगाफटका करून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघडी करून हिरव्याची साथ दिली, त्याच दिवशी त्यांचे हिंदुत्व फिके पडले. नोटा पेक्षा कमी मत पडली याचे विश्लेषण शिवसेनेन करावे. दानवे म्हणाले की, राज्यातील सत्तेत जे आहेत त्यांनी विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. राज्याला पूर्वपदावर आणले पाहिजे. मागचा अनुभव पाहता उद्धव ठाकरे कधी कोणापुढे डोकं टेकवतील हे संगता येत नाही, अशी खोचक टीका ही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.