Pankaja Munde: लिंबागणेश येथील विकासकामाचा लोकार्पण सोहळ्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थिती दर्शवली. छोट्या शस्त्रक्रियेनंतर बऱ्याच दिवसांनी पंकजा मुंडे लोकांसमोर आल्या आहेत. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझी छोटी शस्त्रक्रिया झाली आहे. पंधरा दिवसानंतर मी पुन्हा राजकीय मैदानात उतरणार आहे, असा इशारा पंकजा मुंडे यांनी विरोधकांना दिलाय.
बीडच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं भाष्य
"माझी छोटी शस्त्रक्रिया झाली आता पुन्हा 15 दिवसानंतर मी मैदानात उतरले आहे. सध्या बीडची काय परस्थिती आहे वेगळं सांगायची गरज नाही. सत्ताधारी पक्षाच्या एक आमदाराने विधानसभेत हे सगळं सांगितलं आहे. वाळूच्या खड्ड्यात बुडुन चार मुले मेली त्यावरही विनोदात्मक बोलले पालकमंत्री हे चुकीचं आहे. कोणालाही हटवण्यासाठी आमचं राजकारण नाही फक्त भ्रष्टाचार हटवण्यासाठी आमचं राजकारण आहे.आमचं नाणं खणखणीत आहे, त्यांचं नाणं कोणतं आहे त्यांनी पाहावं हे तीन तिघाडा काम बिघाडा आहे.देवेंद्रजींचा 25 वर्षांचा अनुभव आहे. त्यांना जी माहिती आहे ती त्यांनी विधानसभेत दिली. त्याबाबत मला अधिक काही बोलायचं नाही", असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
भाजप स्वबळावर लढणार- पंकजा मुंडे
राष्ट्रवादीने आघाडीत कोणाला घ्यायचं किंवा कोणासोबत जायचे हे त्यांचा निर्णय आहे. यात एमआयएम इम्तियाज जलील त्यांच्या सोबत जायला तयार असतील तर त्यावर टिप्पणी करण्याचे कारण नाही. कोणी कोणासोबत गेले तरी, भाजप स्वबळावर लढणार आहे. तेही संपुर्ण ताकतीनीश लढणार आहे. आमचं नाणं खणखणीत आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
मुंडे बहिण भावात शाब्दिक युद्ध रंगलं
बीड मधील मुंडे बहिण भावात आज पुन्हा आरोप प्रत्यारोप पहायला मिळाला. धनंजय मुंडे यांनी दुपारी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केलं.तर,सायंकाळी बीड तालुक्यातील बेलेश्र्वर याठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान याच निमित्ताने या बहिण भावात शाब्दिक युद्ध रंगलं. पाच वर्ष आम्ही सत्तेत होतो प्रत्येक कोन शिला आणि निमंत्रण पत्रिकेवर त्यांचं नाव असायचे आज त्यांनी मोठेपणा दाखवला नाही. मात्र,आम्ही नक्की दाखवू, मी बीड जिल्ह्याची बदनामी नाही तर काळजी केली. ते विरोधी पक्षात असताना वेठीस धरायचे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्या वर निशाणा साधला आहे.
हे देखील वाचा-
- नितीन गडकरींचे महाराष्ट्राला गिफ्ट; 2100 कोटींहून अधिकच्या रस्ते कामांना मंजूरी
- Dhananjay Munde : बीडच्या विकासासाठी एका व्यासपीठावर या ; धनंजय मुंडेंचे प्रीतम मुंडेंना आवाहन
- Coronavirus Update : तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या शंभरच्या आत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha