मुंबई : मुख्यमंत्री (Chief Minister) आपला असेल यासाठी निवडणूक महत्त्वाची, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशिवाय पर्याय नाही हे लोकांना कळलंय, असं वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, जे काही सांगायचे होते ते सगळ्यांनी सांगितलं आहे. याच 2022 मध्ये पक्ष फोडला तेव्हा मला उद्धवजींनी सांगितले, किती मावळे आहे ते बघा, म्हणून याच हॉलमध्ये बैठक घेतली. बाहेर पाऊस पडत होता आणि याच हॉलमध्ये झालेल्या बैठकीनंतर गद्दार मुंबईत यायला घाबरत होते. पोलिसांच्या सुरक्षेत ते मुंबईत आले, यामुळे या हॉलची आठवण आहे. 303 वरुण 240 वर नेले हाच देशाचा विजय आहे, असंही ते म्हणाले. मुंबईमध्ये ते बोलत होते.


कीर्तिकर यांची जागाही आपण जिंकणार, परब साहेबांचा शब्द


मुंबईत नगरसेवकर गद्दार आमदार, खासदार पळून गेले आणि आपली यंत्रणा खेचून नेल्यावर आपण नऊ जागा जिंकलो. निगेटिव्हमधून सुरु करुन आपण नऊ जागा जिंकलो. जो पक्ष सत्तेत असून दुसऱ्याकडून नेते घ्यावे लागले, जो पक्ष देशात मोठा होता, त्या धाडी वगैरे कारवाई करुन सुद्धा तो 9 वर आहे. कीर्तिकर यांची जागाही आपण जिंकणार हा परब साहेबांनी शब्द दिला आहे, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. 


मुख्यमंत्री आपला असेल यासाठी निवडणूक महत्त्वाची


आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री आपला असेल यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. उद्या ही हेडलाईन होईल. पुन्हा-पुन्हा नोंदणी करण्याची पाळी येऊ देऊ नका. आपण जी मेहनत वेगवेगळ्या संघटनांनी मेहनत केली. 90 हून जास्त टक्केची नोंदणी आपण केली, तुम्ही सगळ्यांनी केली आहे. अर्धी निवडणूक आपल्या हाती आली आहे. निवडणुकीत सर्वात जास्त महत्त्वाचे असणारे आहे की, जी आपली लोक आहेत, आपली जाबदारी आहे की, त्यांना आपण मतदान केंद्रापर्यंत नेत आहोत. 


सिनेटमध्ये सुद्धा आपण 10 पैकी 10 जिंकलो यामधून आपली नोंदणी जास्त असल्यामुळे विजय आपला होतो. अनिल परब यांच्या समोरच्या बॉक्समध्ये फक्त 1 नंबर काढायचा आहे. उद्धवजी सांगतील जास्त मतदान पाहिजे, अनिल परब सांगतील जास्त मताधिक्य आहे. जेव्हा निवडणुकीत आपला उमेदवार ठरवायचे होते, तेव्हा सगळ्यांचे काम आणि टर्म पहिले आहेत. पोतनीस यांची टर्म संपत आहे, पण अनिल परब यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी अनेकांनी मागणी केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. 


लोकांना कळलंय, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही,


अनिल परब यांच्यावर अनेक केसेस आहेत, ती सुद्धा केस स्टडी ठरू शकते. माझ्यावर एक केस आहे, दिलाईड रोडवर आम्ही गाडी चालवली. रोड सुरु केला त्याबद्दल केस घेतली आहे. आपल्या हक्कासाठी परब यांनी केस घेतल्या आहेत. भाजपकडे ही केस आहेत, पण त्यांच्याकडे रेवण्णा आहे. त्याच्यासाठी मोदींनी जाऊन प्रचार केला आहे. ही आपली विधानसभेसाठी तयारी आणि सराव आहे. काही ठिकाणी मतदान विभागले आहे, पण ही निवडणूक पक्की आहे. आता लोकांना कळलं आहे, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.