ABP Cvoter Survey for Punjab Election 2022 : पंजाबमध्ये पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवरुन राजकीय आंदोलन तीव्र होत आहे. दरम्यान, सी वोटरने एबीपी न्यूजसाठी एक सर्वेक्षण केले आहे. ABP Cvoter Survey मध्ये लोकांचा मूड समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, जर आता निवडणुका झाल्या तर सत्ताधारी काँग्रेस 32 टक्के, अकाली दल (एसएडी) 22 टक्के, आम आदमी पार्टी (आप) 36 टक्के, भाजप 4 टक्के आणि इतर 6 टक्के मते मिळवू शकतात.


पंजाबमध्ये कोणाला किती मतं?
एकूण सीट- 117
काँग्रेस- 32%
अकाली दल- 22%
आप -36%
भाजप - 4%
अन्य- 6%


जागांविषयी बोलायचे झाले तर, सर्वेक्षणात आम आदमी पार्टी (आप) या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. सध्या 'आप' हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. सर्वेक्षणानुसार, आगामी निवडणुकांमध्ये आप सरकार बनवू शकते. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. आपला 49 ते 55 जागा मिळू शकतात. दुसरीकडे, काँग्रेसला 39 ते 47, अकाली पक्ष 17 ते 25, भाजप आणि इतरांना 0 ते एक जागा मिळू शकते. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला 59 जागांची गरज आहे.


पंजाबमध्ये प्रामुख्याने तीन पक्ष आहेत- काँग्रेस, शिरोमणी अकाली दल (एसएडी), आम आदमी पार्टी (आप). गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 77 जागा मिळाल्या, अकाली दलाला 15 आणि आम आदमी पक्षाला 20, भाजपला तीन आणि इतरांना दोन जागा मिळाल्या. आता राज्यात अशा वेळी निवडणुका होणार आहेत, जेव्हा जवळपास वर्षभरापासून केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. हा निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे.


टीप - सी वोटरने एबीपी न्यूजसाठी यूपी, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोव्याचा मूड जाणून घेतला आहे. या सर्वेक्षणात 98 हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे. हे सर्वेक्षण 4 सप्टेंबर 2021 ते 4 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये त्रुटीचे मार्जिन प्लस मायनस तीन ते प्लस मायनस पाच टक्के आहे.