ABP Majha C voter opinion poll : लोकसभा निवडणुकीमुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. देशात पुन्हा एकदा मोदी यांचीच सत्ता येणार, असा दावा भाजपकडून केला जातोय. तर यावेळी जनता भाजपला नाकारून इंडिया आघाडीला सत्ता देणार, असा विश्वास विरोधक व्यक्त करत आहेत. दरम्यान, येत्या 4 जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार 17 एप्रिल रोजी संपत आहे. त्याआधी एबीपी सी वोटर ओपिनियन पोलने देशात कोणाला किती जागा मिळणार? याचा अंदाज व्यक्त केला आहे. 


देशातील जनतेच्या मनात काय? हे जाणून घेण्यासाठी  सी वोटरने एबीपी माझासाठी सर्व्हे केला होता. हा सर्व्हे 11 मार्च ते 12 एप्रिल या काळात करण्यात आला. या सर्वेक्षणात एकूण 57 हजार 566 लोकांचे मत जाणून घेण्यात आले. या सर्वेक्षणाच्या मदतीनेच देशात कोणाची सत्ता येणार? देशातील जनता कोणाला निवडून देणार? याचा अंदाज बांधण्यात आला. या सर्वेक्षणानुसार वेगवेगळ्या राज्यांत नेमकी काय स्थिती असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


बिहारमध्ये काय स्थिती? 


बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. यातील साधारण 33 जागा या एनडीएला तर 7 जागा या इंडिया आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. 


दिल्लीमध्ये काय होणार? 


दिल्लीमध्ये लोकसभेच्या एकूण 7 जागा आहेत. या सातही जागांवर एनडीएचेच उमेदवार विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र निवडणूक लढवत आहेत.


गुजरातमध्ये कोणाचा विजय होणार? 


गुजरातध्ये एकूण 26 जागांसाठी निवडणूक होत आहे. या राज्यातही सर्वच जागांवर भाजपाचा विजय होण्याची शक्यता आहे. येथे इंडिया आघाडी एकाही जागेवर विजयी होण्याची शक्यता नाही. 


हरियाणात काय स्थिती? 


हरियाणात लोकसभेच्या एकूण 10 जागा आहेत. यातील 9 जागांवर एनडीए तर 1 जागेवर इंडिया आघाडीचा विजय होण्याची शक्यता आहे. 


मध्य प्रदेशमध्ये कोणाचा विजय? 


मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण 29 जागा आहेत. यातील 28 जागांवर भाजप तर एका जागेवर इंडिया आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो.


उत्तर प्रदेशमध्ये कोणाचा बोलबाला ? 


ओपिनियन पोलनुसार, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असलेले एनडीएला 73 जागा मिळू शकतात. समाजवादी पक्ष काँग्रेसची पक्षाची आघाडी 7 जागांवर बाजी मारु शकते. यूपीमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे, चौथ्यासाठी 13 मे, पाचव्यासाठी 20 मे, सहाव्यासाठी 25 मे आणि शेवटच्या आणि सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.


केरळमध्ये भाजपला क्लिनस्विप 


केरळमध्ये लोकसभेच्या एकूण 20 जागा आहेत. सर्वेक्षणानुसार, काँग्रेस आणि इंडिया आघाडी या सर्व जागा जिंकू शकते. तर भाजप आणि इतरांना त्यांचे खाते उघडता येणार नाही, अशी शक्यता आहे.


तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीची बाजी 


तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत. मात्र, या ओपिनियन पोलमध्ये इंडिया आघाडीने तिथेही एनडिएला क्लीन स्वीप केल्याचे दिसत आहे. भाजपसह एनडिएतील इतर पक्षांना होण्याची वेळ येईल. 


कर्नाटकमध्ये भाजप मारणार मुसंडी 


ओपिनियन पोलनुसार, कर्नाटकात भाजप आणि इनडीएच्या 23 जागा येतील. तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागू शकते. 


(नोट : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार 17 एप्रिल रोजी संपणार आहे. त्याआधी ABP न्यूजसाठी सी व्होटरनं देशभरात लोकांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी 543 जागांवरील ओपिनियन पोल घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांचाही समावेश आहे. प्रकाशित करणाऱ्यात आलेल्या सर्व्हेमध्ये फक्त अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये अंतिम निकालावेळी म्हणजेच 4 जून रोजी बदल होऊ शकतो. ओपिनियन पोलच्या माध्यामातून फक्त लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.)


इतर महत्वाच्या बातम्या 


ABP Majha C voter opinion poll: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?