Lok Sabha Election 2024 Opinion Poll : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा उद्या (बुधवारी) थंडावणार आहेत. देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाकडून विजयाचा अंदाज आपल्या पद्धतीनं व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर एबीपी न्यूज सी व्होटरनं देशातील जनतेचा मूड जाणून घेतला आहे. या सर्व्हेमध्ये अनेक राज्यामध्ये आश्चर्यचकीत करणारा अंदाज समोर आला आहे. दोन राज्यामध्ये भाजपला एकही जागा मिळत नसल्याचा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलाय. 

तामिळनाडूमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली - 

दक्षिणेत एन्ट्री करण्यासाठी तामिळनाडूमध्ये भाजपकडून आपली ताकद पणाला लावली आहे. एआयएडीएमके या पक्षासोबतची युती तोडून भाजप एकटाच मैदानात उतरला आहे. एबीपी न्यूजच्या सी व्होटर सर्व्हेमध्ये तामिळनाडूच्या 39 लोकसभा मतदारसंघाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व्हेमध्ये एनडीएला 19 टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इंडिया आघाडीला 52 टक्के मतं मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. एआयएडीएमके पक्षाला 23 टक्के तर इतरांना सहा टक्के मते मिळतील, अशी शक्यता वर्तवली आहे. 

तामिळनाडूमध्ये एनडीएला 19 टक्के मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पण एकही जागा जिंकताना दिसत नाही. तामिळनाडूमधील सर्वच्या सर्व 39 जागा इंडिया आघाडीच्या पारडण्यात पडू शकतो असा अंदाज वर्तवलाय. 

केरळमध्ये इंडिया आघाडी बाजी मारणार -

केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागांसाठी मतदान होत आहे. केरळमध्ये एनडीएला 21 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. भाजपासाठी हा मोठा आकडा असेल, पण केरळमध्ये भाजपला एकाही जागेवर विजय मिळणार नसल्याचा अंदाज सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आलाय. 

केरळमध्ये इंडिया आघाडीला 43 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. केरळमधील सर्वच्या सर्व जागा इंडिया आघाडीला मिळू शकतात, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलाय. केरळमध्ये एलडीएफला 31 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. 5 टक्के मतं इतरांना मिळतील, असे सांगण्यात आलेय. 

 

राज्य

एकूण जागा

भाजप + काँग्रेस + इतर
तामिळनाडू 39 00 39 00
राजस्थान 25 25 00 00
केरळ 20 00 20 00
गोवा 2 1 1 00
दिल्ली 7 7 0 0
पश्चिम बंगाल 42 20 2 20 (टीएमसी)
कर्नाटक 28 23 5 0
पंजाब 13 2 7 4 (आप)
छत्तीसगढ 11 10 1 0
मध्य प्रदेश 29 28 1 0
बिहार 40 33 7 0
हरियाणा 10 9 1 0
आसाम 14 12 2 0


 
(नोट : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे.  पहिल्या टप्प्यातील प्रचार 17 एप्रिल रोजी संपणार आहे. त्याआधी ABP न्यूजसाठी सी व्होटरनं देशभरात लोकांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी 543 जागांवरील ओपिनियन पोल घेतला आहे.  11 एप्रिल ते 12 एप्रिल यादरम्यान हा सर्व्हे करण्यात आला आहे. सर्व्हेमध्ये 57 हजार 566 लोकांनी आपलं मत नोंदवलं आहे. सर्व्हेमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते 5 टक्के असा असू शकतो.  प्रकाशित करणाऱ्यात आलेल्या सर्व्हेमध्ये फक्त अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये अंतिम निकालावेळी म्हणजेच 4 जून रोजी बदल होऊ शकतो. ओपिनियन पोलच्या माध्यामातून फक्त लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.)