मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) धूम आहे. लवकरच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे. त्याआधी सर्वपक्षीय नेते जोमात प्रचार करत आहेत. या निवडणुकीत आम्हीच बाजी मारणार, असा दावा प्रत्येक पक्षाकडून केला जातोय. दरम्यान, शिवसेना पक्षाचे दोन गट पडल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीत कोण किती जागांवर बाजी मारणार, असे विचारले जात आहे. दरम्यान, या निवडणुकीचा निकाल येत्या 4 जून रोजी स्पष्ट होणार असला तरी एबीपी सी वोटर्सच्या सर्वेने (ABP Majha C Votres Opinion Poll) या निवडणुकीचा संभाव्य निकाल सांगितला आहे. या निवडणुकीत ठाकरे यांच्या शिवसेनेला 9 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. 


उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? (Lok Sabha Election 2024 Opinion Poll Uddhav Thackeray Shiv Sena seats)


या निवडणुकीत ठाकरे गट हा महाविकास आघाडीचा भाग आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेला एकूण 21 जागा मिळालेल्या आहेत. यातील साधारण 9 ते 10 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त जागांवर आपला विजय व्हावा यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात आहेत. सांगली, कल्याण, ठाणे यासारख्या जागा ठाकरेंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत. त्यामुळे या जागांवर त्यांच्या उमेदवाराचा विजय होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण त्याआधी ठाकरेंची शिवसेना एकूण 9 ते 10 जागांंवर विजय मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा? (Lok Sabha Election 2024 Opinion Poll Eknath Shinde Shiv Sena seats)


तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेनादेखील अशीच कामगिरी करणार आहे. शिंदे यांच्या पक्षाचाही एकूण 9 ते 10 जागांवर विजय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच दोन्ही पक्षांना या निविडणुकीत समान जागा मिळू शकतात.


महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार? (Lok Sabha Election 2024 Opinion Poll)


महायुती- 30 
महाविकास आघाडी- 18
---------------
एकूण जागा- 48


महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा? (Lok Sabha Election 2024 Opinion Poll Mahayuti seats)


भाजप- 21-22
शिवसेना (शिंदे गट)- 9-10
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 0
------------------
एकूण जागा- 30-32


महाविकास आघाडीला किती जागा? 


काँग्रेस- 03
शिवसेना ( ठाकरे गट)-  09-10
राष्ट्रवादी- (शरद पवार गट)-  05
--------------------
एकूण जागा- 18 


दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जून रोजी लागणार आहे. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे निकालाकडेही सर्वांचेच लक्ष असणार आहे.