Sangli Loksabha : सांगली लोकसभेची (Sangli Loksabha) जागा महाविकास आघाडीला सुटल्यानंतर इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंडाची तयारी केली आहे. सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांना (Chandrahar Patil) उमेदवारी घोषित केल्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजप नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस आणि विशाल पाटलांच्या जखमांवर मीठ चोळलंय.
काय म्हणाले अशोक चव्हाण ?
अशोक चव्हाण विशाल पाटलांबद्दल बोलताना म्हणाले, वसंतदादाच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारणे हा पक्षांतर्गत गटबाजीचा परिणाम आहे. महाराष्ट्र्रात काँग्रेसचे नेतृव कमुवत झाल्याची प्रतिक्रिया भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. सांगलीत वसंत दादाच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारणं हा पक्षांतर्गत गटबाजीचा परिणाम आहे. काँग्रेस पक्ष कमकुवत होत चालल्याने मातब्बर नेते पक्ष सोडून जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.
सांगलीत विशाल पाटलांचे शक्तीप्रदर्शन
सांगली लोकसभेत इच्छुक असलेल्या विशाल पाटलांनी सोमवारी (दि.16) अर्ज दाखल केला. त्यानंतर आज विशाल पाटलांनी सांगलीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. शक्तीप्रदर्शन केल्यानंतर विशाल पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचेही आवाहन केले.
विशाल पाटील काय म्हणाले?
सांगलीत शक्तीप्रदर्शन केल्यानंतर विशाल पाटील म्हणाले, काँग्रेस पक्ष आपल्या विरोधात नाही. आघाडीमध्ये नक्कीच काही अडचणी आहेत. त्यामुळे घोषणा झाल्या आहेत. काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय. कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. मात्र, त्यांनी संयम बाळगावा, असं आवाहनही विशाल पाटील यांनी यावेळी बोलताना केलं.
चंद्रहार पाटलांची भूमिका काय?
सांगलीच्या जागेवरुन वादंग सुरु असाताना ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. चंद्रहार पाटील म्हणाले "माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल तर , माझी उमेदवारी मागे घेण्याची संपूर्ण तयारी आहे. काँग्रेला शेतकरी पुत्राला खासदार होऊ द्यायचे नाही, असं स्पष्ट करावे. माझ्याकडे कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा नाही. शेतकऱ्यांचा मुलगा खासदार होतोय हे दुखणे आहे की शिवसेनेचा खासदार होणार आहे हे दुखणे आहे हे मला कळेना. हे सर्व पाहून माझ्या मनाला खूप वेदना होतात. महाराष्ट्रातील मी एकमेव उमेदवार असेन ज्याची उमेदवारी चार वेळा जाहीर होऊनही मविआ मधील काही घटक पक्ष अजूनही आमच्या पासून लांब आहेत."
इतर महत्वाच्या बातम्या