मुंबई : परभणीत काँग्रेसचा मोठा मुस्लिम नेता वंचितच्या गळाला लागला असून काँग्रेसचे माजी उपमहापौर, आणि विद्यमान महापालिकेचे सभागृह नेते सय्यद समी सय्यद साहेबजान (माजु लाला) यांची वंचितकडून परभणी विधानसभेसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दहा मुस्लिम उमेदवारांच्या यादीत सय्यद समी यांच्या नावाचा समावेश, सय्यद समी परभणी काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सय्यद सामी यांचे भाऊ सय्यद खालेद यांनी विधानसभा निवडणूक लढवत 45 हजार मतदान घेत दुसरा क्रमांक गाठला होता. वंचितने आज 10 उमेदवारांची यादी जाहीर केली असून सर्वच्या सर्व मुस्लीम आहेत. राज्यातील विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. त्यात, मनसेनंतर वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली असून वंचितने आज 10 विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे वंचितने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये सर्वच्या सर्व 10 उमेदवार मुस्लीम आहेत. राज्यातील मुस्लीम (Muslim) बहुल मतदारसंघातून वंचितने मुस्लीम उमेदवारांना संधी दिलीय. त्यामध्ये, प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीसाठी (Vanchit) राज्यातील मलकापूर, बाळापूर, परभणी, औरंगाबाद मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर, माण, शिरोळ आणि सांगली या 10 विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांची घोषणा केली आहे.


आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून लवकरच जागावाटप घोषित होऊ शकते. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आता, अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही आत्तापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी वंचितच्या 11 उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. त्यामध्ये, वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यात आलंय. रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. शमिभा या तृतीयपंथीय (transgender) असून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर, आज 10 मुस्लीम उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलीय.  


दरम्यान, ऑक्टोबर 12  पर्यंत निवडणुकीचे नोटिफिकेशन निघेल असं गृहित धरुन आम्ही चाललो आहे. 15 नोव्हेंबरला कुठल्याही परिस्थितीत मतदान घ्यावं लागेल आणि निकाल जाहीर करत शपथविधी कार्यक्रम घ्यावा लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच म्हटलं होतं. त्यानुसार,  म्हणाले.


वंचितने जाहीर केलेले  10 उमेदवार


1. शहेजाद खान सलीम खान मलकापुर विधानसभा


2. खतीब सैय्यद नातीकोद्दीन बाळापूर विधानसभा


3. सय्यद समी सय्यद साहेबजान परभणी विधानसभा


4. जावेद मो. इसाक औरंगाबाद मध्य विधानसभा


5. सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर गंगापूर विधानसभा


6. अयाज गुलजार मोलवी कल्याण पश्चिम विधानसभा


7. मोहम्मद अफरोज मुल्ला हडपसर विधानसभा


8. इम्तियाज जाफर नदाफ माण विधानसभा


9. आरिफ मोहम्मद अली पटेल शिरोळ विधानसभा


10. आल्लाउद्दीन हयातचाँद काजी सांगली विधानसभा


वंचितकडून यापूर्वी जाहीर झालेले 11 उमेदवार 


रावेर - शमिभा पाटील
सिंधखेड राजा - सविता मुंडे 
वाशीम - मेघा डोंगरे
धामणगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा
नागपूर साऊथ वेस्ट -  विनय भांगे
डॉ. आविनाश नन्हे - साकोली
फारुख अहमद - दक्षिण नांदेड
शिवा नरांगळे -लोहा
विकास रावसाहेब दांडगे- औरंगाबाद (संभाजीनगर)
किसन चव्हाण - शेवगाव
संग्राम माने - खानापूर 


हेही वाचा


गळ्यात पाटी, पाटीवर स्कॅनर; पाकिस्तानात गेलेल्या जवान चंदू चव्हाणचे धुळ्यात भीक मागो आंदोलन